आर्मानिया आणि अजरबैजान युद्धाचं कारण काय? भारत कुणाच्या बाजूने?

आर्मानिया आणि अजरबैजान युद्धाचं कारण काय? भारत कुणाच्या बाजूने?

आर्मानिया आणि अजरबैजान हे दोन्ही देश 17 दिवसांपासून युद्ध करताहेत आणि यामध्ये जग पुन्हा एकदा 2 गटांमध्ये विभागलेलं पाहायला मिळतंय.

Akshay Adhav

|

Oct 15, 2020 | 1:03 PM

नवी दिल्ली : जगावर पुन्हा एकदा तिसऱ्या महायुद्धाचे ढग घोंगावताना दिसताहेत आणि याला कारण ठरलंय मध्य पूर्वेकडील 2 देशांमध्ये सुरु असलेलं युद्ध. आर्मानिया आणि अजरबैजान… हे दोन्ही देश 17 दिवसांपासून युद्ध करताहेत आणि यामध्ये जग पुन्हा एकदा 2 गटांमध्ये विभागलेलं पाहायला मिळतंय. त्यातच रशियानं मध्यस्थी करत शांती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मात्र याचा काहीही फायदा झाला नाही. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या युद्धात 600 हुन अधिक सैनिकांचा मृत्यू झालाय. दोन्ही देश तोफा, रणगाडे आणि हेलिकॉप्टरनं एकमेकांच्या शहरांवर हल्ले करताहेत.आर्मानियाचे आतापर्यंत 600 जवान मारले गेलेत तर अजरबैजाननं त्याला झालेल्या नुकसानीची माहिती दिलेली नाही. (What Is The reason war in Armenia and Azerbaijan)

पण या युद्धाचं कारण काय हे आपण समजून घेऊया…

हे प्रकरण अगदी भारत-पाकिस्तान आणि काश्मीर सारखचं आहे.अर्मानिया ख्रिश्चन बहुल देश आहे तर अजरबैजान मुस्लिमबहुल 100 वर्षांपूर्वी म्हणजेच पहिल्या महायुद्धावेळी हा सगळा भाग मिळून एकच देश होता. जो ट्रान्स कॉकेशियन फेडरेशनचा भाग होता. 1918 ला पहिलं महायुद्ध संपलं आणि त्यानंतर याचे 3 भाग झाले हे कोणते तर अर्मेनिया, अजरबैजान आणि जॉर्जिया.

इकडं महायुद्ध संपलं..आणि तिकडे रशियात बॉल्शेविक क्रांती झाली. 1920 च्या दशकात जोसेफ स्टालिननं अजरबैजान आणि जॉर्जियाला सोवियत रशियामध्ये सामील केलं. त्यानंतर नवीन सीमा तयार झाली आणि हेच आताच्या युद्धाचं कारण ठरतंय. दोन्ही देशात एक डोंगराळ प्रदेश आहे, ज्याचं नाव आहे नगोरनो काराबाख.

4 हजार 400 चौरस किमीचा हा भूभाग आहे. इथं पारंपरिक रुपानं ख्रिश्चन समुदाय जास्त राहतो. शिवाय तुर्कीतलं मूळ असणारे मुस्लिमही इथं राहतात. जोसेफ स्टॅलिननं एक चाल खेळली, त्यानं अर्मेनियाई मूळ असणाऱ्या नागोरनो काराबाखचा भाग मुस्लिम बहुल अरजबैजानमध्ये सामाविष्ट केला. यातून या दोन देशांत भांडण लागली. यामुळं रशियाचं साम्राज्य अबाधित राहिलं असं स्टॅलिनला वाटलं. याशिवाय तुर्कीला खूश करण्यासाठी आणि सोवियत संघामध्ये सामाविष्ट करण्यसाठी स्टॅलिननं हे केल्याचं बोललं जातं.

अर्मेनियानं याला विरोध केला आणि अरजबैजानसोबत संबंध खराब झाले. 1923 साली स्टॅलिननं नगोरना काराबाखला स्वायत्त दर्जा दिला पण तोही अजरबैजानच्याच सीमेत…

नगोरना काराबाख हा अजरबैजानच्या हद्दीत स्वतंत्र होता. ज्यामध्ये 94 टक्के लोक हे अर्मेनियाई मूळ असणार होते. त्यामुळं ही भांडणं आणखीच वाढली. मात्र तेव्हा या देशांमध्ये युद्धाची स्थिती नाही आली कारण हे दोन्ही देश सोवियत संघाचा भाग होते..मात्र 1985 नंतर सोवियत संघाचं अस्तित्त्व कमी झाली. 1988 ला नगोरना काराबाखच्या विधानसभेनं थेट अर्मेनियात सामील होण्याचा प्रस्ताव पारीत केला. यामुळं अजरबैजान हादरला. 1991 साली सोवियत संघ विघटीत झाला…आणि नागोरना काराबाखनं स्वत: स्वतंत्र घोषित केलं. त्यानंतर अजरबैजान आणि अर्मेनियात युद्ध सुरु झालं. जे 2 वर्षांपर्यंत चाललं. ज्यात तब्बल 30 हजारांहुन अधिक सैनिक मारले गेले..त्यानंतर पुन्हा एकदा रशियानं यात मध्यस्थी केली आणि युद्धबंदी झाली. आताचं युद्धही याच नागोरना काराबाखवरुन सुरु आहे..

आता भारत यामध्ये कुणाच्या गटात आहे हा प्रश्न पडतो…

मात्र भारतानं या युद्धात शांतीचीच भूमिका घेतली आणि तटस्थ राहिलाय. भारताचे अजरबैजना आणि अर्मेनिया या दोन्ही देशांसोबतचे संबंध सलोख्याचे आहेत. मात्र, पाकिस्तान या युद्धात अजरबैजानच्या बाजूनं आहे. शिवाय अजरबैजानला मदत करणारा तुर्की काश्मीर मुद्द्यावर भारताचा विरोध करतो, आणि पाकिस्तानची बाजू घेतो. तरीही भारतानं कधीही अजरबैजानशी वाईट संबंध ठेवले नाहीत. तर दुसरीकडे अर्मेनिया कायम भारताच्या बाजूनं उभा राहिलाय. आंतरराष्ट्रीय मंचावरही काश्मीरच्या मुद्द्यावर तो भारताचं समर्थनंच करतोय. भारताला या दोन्ही देशातून येणाऱ्या पाईपलाईनमधूनच इंधनाचा पुरवठा होतो. युद्ध झालं तर ही पाईपलाईन उद्धव्स्त होण्याची शक्यता आहे. जे भारताला परवडण्यासारखं नाही..यामुळंच शांतीनं मार्ग काढावा याच मतावर भारत ठाम आहे. (What Is The reason war in Armenia and Azerbaijan)

संबंधित बातम्या

इराणच्या इशाऱ्याने विध्वंसक युद्धाची शक्यता, आर्मेनिया आणि अजरबैजान देशांमध्ये हजारो निष्पापांचे बळी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें