AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापूर- गोवा मार्गावर भीषण अपघात, वैभववाडी करुळ घाटात ट्रक 200 फूट खोल दरीत कोसळला

कोल्हापूर गोवा मार्गावरिल वैभववाडी करुळ घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक दोनशे फूट खोल दरीत कोसळला आहे. (Truck collapsed into 200 feet deep gorge in Vaibhavwadi Karul Ghat)

कोल्हापूर- गोवा मार्गावर भीषण अपघात, वैभववाडी करुळ घाटात ट्रक 200 फूट खोल दरीत कोसळला
| Updated on: Oct 26, 2020 | 12:51 PM
Share

सिंधुदुर्ग : कोल्हापूर गोवा मार्गावरिल वैभववाडी करुळ घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक दोनशे फूट खोल दरीत कोसळला आहे. कोल्हापूरहून गोव्याकडे जाणार ट्रक वैभववाडी करुळ घाटात दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातामध्ये जीवितहानी झालेली नाही. जखमी ट्रकचालकाला वैभववाडी पोलिसांनी सह्याद्री जीवरक्षक टीमच्या मदतीने दरीतून बाहेर काढण्यात आले आहे. (Truck collapsed into 200 feet deep gorge in Vaibhavwadi Karul Ghat)

अपघात झालेला ट्रक कोल्हापूरहून गोव्याकडे मैद्याचे पीठ घेऊन निघाला होता.  हा  ट्रक करूळ घाटात अवघड वळणावर आल्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे दोनशे फूट दरीत कोसळला. या ट्रकचे चालक श्रीमंत बिकट (वय 50 करवीर, कोल्हापूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातावेळी क्लिनरने ट्रकमधून उडी मारल्यामुळे बचावला आहे.

अपघाताची माहिती मिळताच वैभववाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी करूळ येथील सह्याद्री जीवरक्षक टीमच्या मदतीने मदतकार्य सुरु केले. दोनशे फूट दरीत उतरून ड्रायव्हरला बाहेर काढून त्याचे प्राण वाचवण्यात आले.

दरम्यान, बचावकार्य केल्यानंतर जखमी ड्रायव्हरला कोल्हापूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातप्रकरणी वैभववाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या:

पीकअपच्या भीषण अपघातात दुचाकीस्वारांनी दिला मृत्यूला चकवा, थरकाप उडवणारं CCTV फूटेज

नंदुरबारमध्ये खाजगी बसचा भीषण अपघात, 35 प्रवासी जखमी, 4 जणांचा मृत्यू

(Truck collapsed into 200 feet deep gorge in Vaibhavwadi Karul Ghat)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.