AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तांदूळ घेऊन आलेले ट्रकचालक उपाशी, नवी मुंबईत भुकेले ट्रकचालक मेटाकुटीला

मुंबईला धान्याचा पुरवठा करणाऱ्या ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनर यांच्यासाठी पिण्याचं पाणी आणि जेवणाची सुविधाही नसल्याचं समोर आलं आहे (Truck drivers suffering for food and Water in APMC).

तांदूळ घेऊन आलेले ट्रकचालक उपाशी, नवी मुंबईत भुकेले ट्रकचालक मेटाकुटीला
| Updated on: May 02, 2020 | 12:19 AM
Share

नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने देशभरात पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. या लॉकडाऊनच्या काळात मुंबईकरांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होऊ नये त्यासाठी हजारो किलोमीटर प्रवास करुन शेकडो ट्रक गहू, तांदूळ, डाळी आदी खाद्यपदार्थाची वाहतूक करतात. मात्र, याच ट्रकचे ड्रायव्हर आणि क्लिनर यांच्यासाठी पिण्याचं पाणी आणि जेवणाचीही सुविधा नसल्याचं समोर आलं आहे (Truck drivers suffering for food and Water in APMC). त्यामुळे या ट्रक चालकांना हालाखीच्या परिस्थितीत राहण्याची नामुष्की आली आहे.

मुंबई एपीएमसी परिसरात आणि ट्रक टर्मिनलमध्ये देशाच्या सर्व भागातून शेकडो धान्याच्या गाड्या येऊन थांबल्या आहेत. सध्या धान्य बाजारात कोरोनाचे 16 रुग्ण आढल्याने काही व्यापारी येत नाहीत. कोकण आयुक्त, एपीएमसी प्रशासनाने, व्यापारी आणि पोलिसांची एक बैठक घेतली. त्या बैठकीत धान्य मार्केटमध्ये दिवसभरात बाहेरुन येणाऱ्या कडधान्याच्या 300 गाड्या आत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, काही व्यापाऱ्यांकडून जास्त माल मागवण्यात आला. मात्र, दुसरीकडे अनेक व्यापाऱ्यांच्या गोदामातही मोठ्या प्रमाणात कडधान्य पडून असल्याचं दिसत आहे. त्यामुळे एपीएमसी परिसरात आणि ट्रक टर्मिनलमध्ये मोठ्या प्रमाणात कडधान्याच्या गाड्या जवळपास 8 ते 10 दिवसांपासून उभ्या आहेत. या स्थितीत गाड्यांमध्ये असणाऱ्या ड्रायव्हर आणि क्लिनर लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

सध्या या चालकांसाठी गुरुद्वाराकडून काही प्रमाणात जेवणाचे वाटप होते. मात्र जेवण झालं की पिण्यासाठी पाण्याची सोय नाही, रस्त्यावर जसं पाणी मिळेल तेच अशुद्ध पाणी पिण्याची वेळ येत आहे. हे पाणी खूप खराब असल्याची तक्रार या चालकांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केली आहे. इम्तियाज नावाचे चालक आंध्रप्रदेशमधून 6 दिवस झाले तसे तांदूळ घेऊन आले आहेत. त्यांना अजूनही टोकन मिळालेलं नाही. मात्र, काही दलाल 500 ते 1000 रुपये घेऊन गाडी आत सोडण्याचं काम करत असल्याचीही तक्रार चालकांकडून येत आहेत. इम्तियाज म्हणाले, “मुंबईमध्ये लोकांना जेवणाचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही हजार किलोमीटर प्रवास करुन आलो. मात्र, आम्हालाच जेवण मिळत नाही. व्यापाऱ्याला फोन केल्यावर ते कधी उचलतात, तर कधी उचलतही नाही. सरकारने आमच्याकडे लक्ष्य द्यायला पाहिजे.

इम्तियाजसारखे शेकडो ड्रायव्हर रात्रंदिवस हजारो किलोमीटर गाड्या चालवून मुंबईकरांना जेवण मिळेल यासाठी अन्नधान्याची वाहतूक करत आहेत. मात्र, त्यांनाच धान्य मार्केटमध्ये कोणतीही सोयी सुविधा मिळत नसल्यानं या चालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. आता 2 दिवस बाजार बंद असल्याने गेली 7 ते 10 दिवसांपासून हजारो टन धान्य गाड्यावर पडून असल्याचं दिसत आहे. एपीएमसी परिसरात आणि ट्रक टर्मिनलमध्ये 1 हजारपेक्षा अधिक गाड्या उभ्या आहेत. यामध्ये तांदूळ, गहू, डाळी, मसाले इत्यादी पदार्थांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 11,506 वर, आज एकाच दिवसात तब्बल 1008 रुग्णांची वाढ

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांना प्रवासाची परवानगी कशी मिळणार? गृहमंत्र्यांकडून नियमावली जाहीर

हैदराबादेतून 450 किमी चालत वर्ध्यात पोहोचला, गोंदियाला जाताना थकला, वाटेतच गळफास

Truck drivers suffering for food and Water in APMC

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.