AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक्स्प्रेस वेवर गस्त घालणाऱ्या पोलिसाला ट्रकचा धक्का, जागेवरच मृत्यू

पनवेल हद्दीत पुणे लेनवर चालणाऱ्या ट्रकला मागून एका ट्रेलरने धडक दिल्याने तिथं गस्त घालणाऱ्या सचिन सोनवलकर यांना दोन वाहनाचा धक्का लागला.

एक्स्प्रेस वेवर गस्त घालणाऱ्या पोलिसाला ट्रकचा धक्का, जागेवरच मृत्यू
| Edited By: | Updated on: Oct 13, 2020 | 10:33 AM
Share

रायगड : मुबंई-पुणे महामार्गावर दोन वाहनांची भीषण धडक झाली अआहे. या अपघातामध्ये गस्त घालत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. रात्रीच्या सुमारात गाड्यांचा अपघात झाला. यावेळी पोलीस कर्मचारी हे ड्युटीवर होते. पण वाहनांची धडक होताना जोरात धक्का लागल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. (truck trailer accident on mumbai pune expressway police died)

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 2.45 च्या सुमारास पनवेल हद्दीत पुणे लेनवर चालणाऱ्या ट्रकला मागून एका ट्रेलरने धडक दिल्याने तिथं गस्त घालणाऱ्या सचिन सोनवलकर यांना दोन वाहनाचा धक्का लागला. गाड्यांचा वेग जास्त असल्यामुळे सचिन सोनवलकर यांना जबरदस्त मार लागला. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सदरची घटना कळताच महामार्ग वाहतुक विभागाचे पनवेल पळस्पाचे सर्व अधिकारी घटना स्थळी दाखल झाले. ठाणे वाहतुक विभागाचे अधिक्षक दिगंबर प्रधान यांनीही घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून सचिन यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर अपघाताचा पुढील तपास पनवेल तालुका पोलीस स्टेशन आणि महामार्ग पोलीस पुढील तपास करत आहे.

दरम्यान, गाड्यांच्या धडकेमध्ये अशा प्रकारे पोलीस कर्मचाऱ्याने जीव गमावल्यामुळे संपूर्ण पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताची माहिती सचिन यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. तर सध्या अपघाती वाहनं रस्त्याच्या बाजूला करण्याचं काम सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

इतर बातम्या –

Weather Alert : राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून अलर्ट जारी

Covid Vaccine Update: कोरोना लस देताच प्रकृती बिघडली, जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सन कंपनीनं ट्रायल थांबवलं

(truck trailer accident on mumbai pune expressway police died)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.