AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe : चकली, चिवडा फरसाण…तुकाराम मुंढेंचं नवं टार्गेट ठरलं, ऐन दिवाळीत FDA ॲक्शन मोडमध्ये!

तुकाराम मुंढे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आतापर्यंत काय काय कारवाई करण्यात आली, याची सविस्तर माहिती दिली. तसेच सध्याच्या सणासुदीच्या काळात एफडीए काय कारवाई करणार, याबाबतही त्यांनी सांगितले.

Tukaram Mundhe : चकली, चिवडा फरसाण...तुकाराम मुंढेंचं नवं टार्गेट ठरलं, ऐन दिवाळीत FDA ॲक्शन मोडमध्ये!
tukaram mundheImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 29, 2026 | 7:00 PM
Share

Tukaram Mundhe : एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्नपदार्थातील भेसळ रोखण्यासाठी आतापर्यंत शेकडो कारवाया केल्या आहेत. सध्या सणासुदीचा काळ आहे. मिटाई, फरसाण अशा खाद्यपदार्थांची या काळात मोठी विक्री होते. हीच बाब लक्षात घेऊन आता तुकाराम मुंढे यांनी नवी मोहीम उघडली आहे. थेट पत्रकार परिषद घेऊन तुकाराम मुंढे यांनी याबाबत माहिती दिलीय. दिवाळीच्या काळात एफडीएकडून नेमकं काय काय केलं जाणार? याची माहिती त्यांनी दिलीय.

दिवाळीत कारवाई वाढणार, या खाद्यपदार्थांवर नजर

तुकाराम मुंढे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आतापर्यंत काय काय कारवाई करण्यात आली, याची सविस्तर माहिती दिली. तसेच सध्याच्या सणासुदीच्या काळात एफडीए काय कारवाई करणार, याबाबतही त्यांनी सांगितले. दिवाळी जवळ आली आहे. त्यामुळे आता आम्ही कारवाईचा वेग वाढवणार आहोत. दिवाळीच्या काळात फराळ, मिठाई, चकली, चिवडा आणि इतर वस्तूंची चौकशी केली जाणार आहे. दिवाळी संपेपर्यंत ही कारवाई सुरू राहणार आहे, अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली.

आतापर्यंत काय काय कारवाई केली?

सणासुदीच्या काळात आजारांच प्रमाण वाढतं. सणासुदीच्या काळात तारीख निघून गेलेले पदार्थ, दर्जाहीन पदार्थ यांची विक्री केली जाते. त्यामुळेही आजार वाढतात. दिवाळी सण जवळ आल्याने मसाले निर्मिती करणाऱ्या 1057 मसाला आस्थापनांवर कारवाई करून चौकशी करण्यात आली आहे. यात 94 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. 11963 क्विंटल मसाले व मसालेजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या मसाल्यांची किंमत 19.69 कोटी रुपये आहे. गोडाऊन आणि कारखान्यांमध्ये ही कारवाई करण्यात आलीय, असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे.

दुकानदारांनाही घ्यावी लागणार काळजी?

दरम्यान तुकाराम मुंढे यांनी दिवळसणात एफडीए आपली कारवाई वाढवणार आहे, असे सांगितल्याने व्यापारी, दुकानदारांना काळजी घ्यावी लागणार आहे. या निर्णयाचे स्वागत केले जातेय. त्यामुळे आता एफडीएच्या कारवाईत कोण लक्ष्य होणार, भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
Nitesh Karale : भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर... कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं, उत्तराची एकच चर्चा
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर..
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर आणताच...
मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई...
Malegaon : मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई; नेमकं काय घडलं?
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना आवाहन
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना नरेश म्हस्के यांचे आवाहन
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार...
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार बाद मतांवरही उपस्थित केले प्रश्न!