धक्कादायक…सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एका महिन्यात तब्बल 26 आत्महत्या

| Updated on: Dec 07, 2020 | 11:58 AM

बार्शी तालुक्यातील 26 आत्महत्यांपैकी 21 घटनांची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे. तर, 5 प्रकरणांची नोंद झाली नाही. 26 suicide at Barshi taluka of Solapur

धक्कादायक...सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एका महिन्यात तब्बल 26 आत्महत्या
Follow us on

सोलापूर: जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एका महिन्यात तब्बल 26 आत्महत्या झाल्या आहेत. त्यातील बहुतांश व्यक्ती या तरुण आहेत. सावकारी कर्जाचा पाश आणि व्यसनाधीनता हे प्रमुख कारण या आत्महत्येचे बाबतीत असल्याचं बोललं जातंय. बार्शीतल्या या आत्महत्यांची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे. बार्शी तालुक्यातील 26 आत्महत्यांपैकी 21 घटनांची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे. तर, 5 प्रकरणांची नोंद झाली नाही. ( 26 persons commit suicide in last one month at Barshi taluka of Solapur)

महिलांची संख्या लक्षणीय

आत्महत्यांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या देखील लक्षणीय आहे. 26 जणांमध्ये 10 महिला तर 16 पुरुषांचा समावेश आहे. आत्महत्या करणाऱ्यांच्या वयोमानाचा आढाव घेतला असता त्यातील 10 जण हे 20 ते 40 वयाचे आहेत. आत्महत्यांमध्ये सावकारी कर्ज आणि व्यसनाधीनता ही प्रमुख कारणं समोर येतायत. जर अशा कारणांमुळे महिन्याभरात इतक्या आत्महत्या सतत होत राहतील तर प्रश्न गंभीर आहे. सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते या अवैध धंदे करणाऱ्यांच्या विरोधात सक्त कारवाई करू, असा सज्जड इशारा देत आहेत. मात्र, प्रत्यक्ष कारवाई केव्हा होणार, आणि बार्शीतल्या या आत्महत्येस प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जबाबदार असणाऱ्या लोकांवर कारवाई कधी होणार हा प्रश्न उपस्थित होत. ( 26 persons commit suicide in last one month at Barshi taluka of Solapur)

लॉकडाऊनमुळं आत्महत्या?

बार्शी तालुक्यातील सूर्यकांत भोईटे यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. त्यांची पत्नी गंगा सूर्यकांत भोईटे यांच्या डोळ्यातल्या अश्रूंच्या सरी कायम सुरू आहेत. केवळ नोव्हेंबर या एका महिन्यात बार्शी तालुक्यात आत्महत्या केलेले सूर्यकांत भोईटे एकटेच नव्हे तर अशा अजून 25 जणांनी बार्शी तालुक्यात आत्महत्या केल्या आहेत. सूर्यकांत भोईटे यांच्या पाठीमागे त्यांचा दिव्यांग मुलगा तेजस, पत्नी गंगा, आई सुमन आणि भाऊ संतोष असा परिवार आहे, सूर्यकांत हे घराच्या समोरच असलेली धान्याची फडी चालवत असत. मात्र, लॉकडाउन झालं व्यवसायासाठी कर्ज घेतलं होतं, त्यामुळं तणाव वाढत गेला परिणामी दारूचं व्यसन लागलं आणि भोईटेंनी त्यांच्या जीवनाचा प्रवास संपवला.

गंगा भोईटे यांनी कुणीही आत्महत्या करु नये, असं आवाहन केलं आहे. बार्शीत चालणाऱ्या अवैध धंदे, बिअर बार, डान्स बार आणि वाढती गुन्हेगारी यांच्या नादी लागून चुकीचा निर्णय घेऊन मुलांना पोरकं करुन नका असही त्यांनी सांगितले.( 26 persons commit suicide in last one month at Barshi taluka of Solapur)

न घाबरता पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन

बार्शी शहर आणि तालुक्यात आत्महत्यांची प्रकरणं वाढल्याचे दिसून येत आहे. वाढत्या आत्महत्यांना बेकायदेशीर सावकारी प्रमुख कारण असल्याचं दिसत आहे. बेकायदेशीर सावकारी आणि इतर त्रास होत असेल तर आत्महत्येचा विचार मना आणू नका, थेट पोलीस ठाण्याशी संपर्क साधा, असं आवाहन बार्शीचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी केलं आहे. बार्शी शहर आणि तालुक्यातील आत्महत्येचं सत्र हे असंच सुरू राहीलं तर सामाजिक संतुलन निश्चितच बिघडणार आहे.


संबंधित बातम्या :

मुंबईत कुटुंबाची सामूहिक आत्महत्या, वडिलांनी दोन चिमुकल्यांसंह संपवलं आयुष्य

आमटे परिवारातील वाद ते विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या, कोण होत्या शीतल आमटे?

दहा दिवसांपूर्वी अटक, बालसुधारगृहात दोन अल्पवयीन मुलांची आत्महत्या, घटना सीसीटीव्हीत कैद

( 26 persons commit suicide in last one month at Barshi taluka of Solapur)