कोरोनाचा कहर, नागपूरमध्ये कोरोनाचे आणखी 2 नवे रुग्ण, 12 तासात 9 नवे कोरोनाबाधित रुग्ण

| Updated on: Apr 14, 2020 | 5:24 PM

नागपुरात गेल्या 12 तासात तब्बल 9 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे (Corona patients in Nagpur).

कोरोनाचा कहर, नागपूरमध्ये कोरोनाचे आणखी 2 नवे रुग्ण, 12 तासात 9 नवे कोरोनाबाधित रुग्ण
Follow us on

नागपूर : राज्यात कोरोनाचं संक्रमण वाढत चाललं आहे (Corona patients in Nagpur). नागपुरात कोरोनाचे आणखी 2 नवे रुगण आढळले आहेत.  गेल्या 12 तासात तब्बल 9 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. या 9 रुग्णांपैकी तिघांची तपासणी शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळेत करण्यात आली. तर 6 जणांची तपासणी एम्समधील प्रयोगशाळेत करण्यात आली होती. या नव्या 9 रुग्णांमुळे नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 56 वर पोहोचली आहे (Corona patients in Nagpur).

नागपुरात गेल्या 12 तासात आढळलेले सर्व नवे कोरोनाबाधित रुग्ण सतरंजीपुरा भागात मृत्यू झालेल्या 68 वर्षीय कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आले होते, अशी माहिती समोर आली आहे. नागपुरच्या सतरंजीपुरा येथे पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. या रुग्णाच्या 6 एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. या रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता.

नागपूरमधील अनेक परिसर सील

कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहे. नागपूरमध्ये ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तो परिसर पूर्णपणे सील करण्यात येत आहे. आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे याकडे लक्ष देत आहेत.

कोरोनाची अद्ययावत आकडेवारी:

Edit
जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 1632 30 101
पुणे (शहर+ग्रामीण) 279 19 30
पिंपरी चिंचवड 29 1
ठाणे (शहर+ग्रामीण) 69 3
नवी मुंबई 59 3 3
कल्याण डोंबिवली 50 2
मीरा भाईंदर 49 2
वसई विरार 31 1 3
उल्हासनगर 1
भिवंडी 1
पालघर 4 1
रायगड 6
पनवेल 9 1 1
नाशिक (शहर +ग्रामीण) 4
मालेगाव 29 2
अहमदनगर (शहर+ग्रामीण) 27 3
धुळे 2 1
जळगाव 2 1
सोलापूर 1 1
सातारा 6 2
कोल्हापूर 6
सांगली 26 4
सिंधुदुर्ग 1
रत्नागिरी 5 1
औरंगाबाद 23 5 1
जालना 1
हिंगोली 1
लातूर 8
उस्मानाबाद 4 1
बीड 1
अकोला 12
अमरावती 5 1
यवतमाळ 5 3
बुलडाणा 17 1 1
वाशिम 1
नागपूर 39 5 1
गोंदिया 1
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) 9 1
एकूण 2455 229 160

संबंधित बातम्या :

नागपुरात कोरोनाचा पहिला बळी, मृतदेह आणि अंत्यविधीसाठी तुकाराम मुंढेंची नियमावली

मुंबईतील कोरोना हॉटस्पॉट सातवरुन पाचवर, ‘जी दक्षिण’मध्येच तीनशेपार रुग्ण

Lockdown Extension : मोदींनी वाढवलेल्या लॉकडाऊनवर एकनाथ खडसे म्हणतात….

लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढला, रेल्वे आणि विमान वाहतुकीचं काय?

पुण्यात किरकोळ भाज्यांचे दर गगनाला, कोरोना संकट काळात ग्राहकांच्या खिशाला कात्री

कोरोना लढ्यासाठी टास्क फोर्स, डॉ. संजय ओक यांची अध्यक्षपदी नियुक्ती