AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lockdown Extension : मोदींनी वाढवलेल्या लॉकडाऊनवर एकनाथ खडसे म्हणतात….

जनतेने मोदींच्या सप्तसूत्रीचे पालन करावं', असं आवाहन भाजप नेते एकनाथ खडसे यांनी नागरिकांना केलं आहे.

Lockdown Extension :  मोदींनी वाढवलेल्या लॉकडाऊनवर  एकनाथ खडसे म्हणतात....
| Updated on: Apr 14, 2020 | 3:46 PM
Share

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशाला संबोधित (Eknath Khadse On Lockdown Extension) करत लॉकडाऊनची मुदत 3 मेपर्यंत वाढवली आहे. ‘ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सर्वांसाठी सप्तसूत्री दिलेली आहे, जनतेने या सप्तसूत्रीचे पालन करावं’, असं आवाहन भाजप नेते एकनाथ खडसे यांनी नागरिकांना (Eknath Khadse On Lockdown Extension) केलं आहे.

“आतापर्यंतचा अनुभव पाहता जनतेने सहकार्य करण्याची गरज आहे. बऱ्याच ठिकाणी कामे नसतानाही लोक बाहेर पडतात, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर ताण पडतो, अशा स्वरुपामध्ये पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेल्या सप्तसूत्री लॉकडाऊन सूचनेचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, त्यामुळे कोरोना पळवण्यासाठी आपल्याला यश येईल. नागरिकांनी सहकार्य करावे”, असे आवाहन एकनाथ खडसे यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

-लॉकडाऊन वाढवण्यात यावा, अशी सूचना प्रत्येक जण करत आहे. लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय अनेक राज्यांनी आधीच घेतला आहे. सर्व सूचना लक्षात घेऊन, आता भारतातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवावे लागेल, हे निश्चित करण्यात आले आहे.

-3 मे पर्यंत आपल्या सर्वांना, प्रत्येक देशवासियाला लॉकडाऊनमध्येच रहावे लागेल. आतापर्यंत आपण करत आलेल्या नियमांचे पालन यापुढेही करावे लागेल

-माझी सर्व देशवासियांना विनंती आहे की आता ‘कोरोना’ आपल्याला कोणत्याही किमतीत नवीन भागात पसरु द्यायचा नाही. आता स्थानिक पातळीवर एकही रुग्ण वाढत असेल, तरी ती आपल्यासाठी चिंतेची बाब असू शकते (Eknath Khadse On Lockdown Extension)

-आपल्याला हॉटस्पॉट्सबद्दल खूप सतर्कता बाळगावी लागेल. हॉटस्पॉटमध्ये रुपांतरित होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांवर बारकाईने नजर ठेवावी लागेल. नवीन हॉटस्पॉट्स तयार होणे, आपल्या श्रम आणि तपस्येला नवीन आव्हान देईल.

-पुढील आठवड्यात कोरोनाविरुद्धच्या लढतीत कठोरता आणखी वाढवण्यात येईल. 20 एप्रिलपर्यंत प्रत्येक शहर, प्रत्येक ठाणे, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक राज्याची चाचणी घेण्यात येईल, लॉकडाऊनचे पालन किती होत आहे, ‘कोरोना’पासून त्या भागाने स्वतःचे किती संरक्षण केले आहे, ते पाहिले जाईल

-या अग्निपरीक्षेत यशस्वी होणारे क्षेत्र, जे हॉटस्पॉटमध्ये नसतील आणि ज्यांचे हॉटस्पॉटमध्ये परावर्तन होण्याची शक्यता कमी असेल, तिथे 20 एप्रिलपासून काही महत्त्वाच्या कामांना सशर्त परवानगी मिळू शकेल.

Eknath Khadse On Lockdown Extension

संबंधित बातम्या :

…तर 20 एप्रिललाच तुम्हाला ‘लॉकडाऊन’मध्ये सशर्त सूट मिळेल

Lockdown | नरेंद्र मोदींच्या निर्णयाला कॉंग्रेसचे दिग्गज नेते शशी थरुर-चिदंबरम यांचा पाठिंबा

कुणालाही नोकरीवरुन काढू नका, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन

महाराष्ट्रातील लॉकडाऊन आणखी तीन दिवस वाढला

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.