अमेरिकेतील अलाक्सामध्ये विमान अपघात, 5 जणांचा मृत्यू

अमेरिकेतील अलाक्सामध्ये विमान अपघात, 5 जणांचा मृत्यू

वॉशिंग्टन (अमेरिका) : अमेरिकेतील अलास्का या ठिकाणी दोन विमानांची टक्कर झाल्याने अपघात झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे.

अमेरिकेत हवेत दोन फ्लोट विमानांची टक्कर झाली. ही टक्कर इतकी जबरदस्त होती की, या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. विमानांची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 10 जण जखमी झाले आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान सध्या अपघात झालेल्या ठिकाणी तटरक्षल दलाचे जवान शोधकार्य करत आहेत.

या दोन्ही विमानात 14 प्रवाशी होते. हे सर्व प्रवाशी कॅनडातील वेनकॉवर या Vancouver या ठिकाणी सात दिवसांच्या सुट्टीवर जात असताना हा अपघात घडला. अपघातग्रस्त झालेले विमान ताकयुवान एअरलाईन्सचे होते.

Published On - 7:52 am, Tue, 14 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI