Bhandara Crime : पिस्तुलचा धाक दाखवून गोल्डन मॅनला लुटण्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद

राज्यात गुन्हेगारी थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. हत्यारांचा धाक दाखवून नागरिकांना, व्यापाऱ्यांना लुटण्याच्या घटनांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे.

Bhandara Crime : पिस्तुलचा धाक दाखवून गोल्डन मॅनला लुटण्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 20, 2023 | 1:48 PM

भंडारा / 20 जुलै 2023 : जिल्ह्यात गोल्डन मॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीला पिस्तुलचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच या व्यक्तीची दोन दुकानेही फोडण्यात आली आहे. शशिकांत राजूरकर असे गोल्डन मॅनचे नाव असून, ते हॉटेल व्यावसायिक आहेत. भंडाऱ्यातील शहापूरमध्ये काल रात्री ही घटना घडली. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलीस घटनेचा सखोल तपास करत आहेत.

काय घडलं नेमकं?

शशिकांत राजूरकर यांच्या बँक ऑफ इंडिया शाखेजवळील दुमजली घराखाली रात्रीच्या सुमारास दोन जण दुचाकीवरुन आले. त्यांनी पिस्तुलचा धाक दाखवत घराखाली असलेल्या दुकानाचे शटर तोडले. तसेच व्यापारी संकुलातील एक दुकाना फोडले आणि काही रक्कम लंपास केली. व्यायासायिकाची किती रक्कम चोरीला गेली, याची अद्याप माहिती कळू शकली नाही.

सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु

सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. जवाहरनगर पोलिसांनी घटनेची नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. किती मुद्देमाल चोरीला गेला? आरोपी कोण? हे तपासाअंती स्पष्ट होईल. मात्र हत्यारं दाखवून चोरटे लुटमार करत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.