AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उस्मानाबादमध्ये दोन पाझर तलाव फुटले, नागरिकांचे स्थलांतर, एअर लिफ्टिंगची व्यवस्था

उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील मुरशदपूर आणि परंडा तालुक्यातील लोहारा वाघेगव्हाण येथील दोन पाझर तलाव फुटले आहेत. (Two Small lakes burst in Osmanabad due to heavy rainfall)

उस्मानाबादमध्ये दोन पाझर तलाव फुटले, नागरिकांचे स्थलांतर, एअर लिफ्टिंगची व्यवस्था
| Updated on: Oct 15, 2020 | 12:55 PM
Share

मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे धरणांतील पाण्यांच्या पातळीत वाढ झाल्यानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणांतून पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळं नंद्यांच्या पाणी पत्रात वाढ झाली आहे. पंढरपुरातील चंद्रभागा नदी काठावरील नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे. पुणे, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, उस्मानाबाद यासह विविध जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यानं रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पुण्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील मुरशदपूर आणि परंडा तालुक्यातील लोहारा वाघेगव्हाण येथील दोन पाझर तलाव फुटले आहेत. (Two Small lakes burst in Osmanabad due to heavy rainfall)

उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्ह्यात पावसांनंतर पुराचा हाहाकार समोर आला असून 2 पाझर तलाव फुटले आहेत. लोहारा तालुक्यातील मुरशदपूर येथील पाझर तलाव फुटल्याने पिकांचे नुकसान झाले आहे तर जीवितहानी झालेली नाही. परंडा तालुक्यातील लोहारा वाघेगव्हाण पाझर तलाव फुटला असून जीवितहानी झाली  नाही. पुरातील पाण्यात अडकलेल्या 84 नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले. बेडगा येथील 2 , गुंजोटी 3 , राजेगाव 6 तर काळेवाडीतील 70 जणांना सुरक्षित स्थळी हलविले.

osmanabad rain

उमरगा तालुक्यातील कदेर येथील अडकलेल्या 2 जणांना काढण्यासाठी एअर लिफ्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात दोन दिवसांच्या पावसानं हाहाःकार माजला आहे. लोहारा, उमरगा परिसरात शेतीचं प्रचंड नुकसान झाले आहे. नदी नाल्यांना मोठा पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शेतात काढून ठेवलेल सोयाबीन गेल वाहून तर दुसरीकडे ऊसाच शिवारही पाण्याखाली गेल आहे. पाण्याच्या प्रवाहानं शेतातील सुपीक मातीही वाहून गेली आहे. उस्मानाबादमधील दोन पाझर तलाव फुटले आहेत.

इंदापूर

बुधवारी रात्री झालेल्या परतीच्या पावसामुळे बळीराजाचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळाले. इंदापूर तालुक्यातील शिरसोडी गावातील भाऊसाहेब चोरमले या शेतकऱ्यांनं 12 एक रात उसाची लागवड केली होती. पावसामुळे संपूर्ण ऊस जमीनदोस्त झालेला आहे मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झाला आहे.

कराड

कराड तालुक्यात गेले दोन दिवस पावसाची रिपरिप सुरू आहे. पावसामुळे तालुक्यातील काढणीस आलेले सोयाबीन आणि भात पीक पाण्याखाली गेली असून पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शहरासह तालुक्यात सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचले असून दुकाने व घरांमध्ये पाणी शिरल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

पालघर

पालघर तालुक्यातील सफाळे परिसरात परतीच्या पावसामुळे शेतकरयांचे मोठे नुकसान झाले आहे.

नांदेड

नांदेड जिल्ह्यात सर्वत्र पिकांमध्ये पाणी साचल्याने सर्वच पिकांचं मोठे नुकसान झालंय. सोयाबीन, कापूस आणि तूर हातातून गेली आहेत. ऊसाच्या शेतीत पाणी साचल्याने उसाला मुळ्या फुटतायत. शेतात असलेल्या सर्वच पिकांना या पावसाचा फटका बसला आहे.

पंढरपूर

पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून शेतीला जलतरण तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पंढरपूर तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्यामुळे द्राक्ष, डाळिंब तसेच खरीप पिकांचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे.

लातूर

लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अतिवृष्टीने पिकांचं मोठं नुकसान केलेलं आहे. सोयाबीन आणि ऊस शेती पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने शेतीला तलावाचे स्वरूप आले आहे.

अहमदनगर

अहमदनगरला जोरदार पावसामुळे तालुक्यातील पिंपळगाव माळवी तलाव पूर्णपणे भरलाय. तर तलाव भरून सांडव्यातून वाहणारे पाणी पुलावर आले आहे. त्यामुळे नगर ते वांबोरी वाहतूक विस्कळित होऊन बंद करण्यात आलीये. तर पावसामुळे जिल्ह्याती ओढे नाले तसेच नद्या पाणी वाहू लागल्या आहेय. तसेच पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहेय.

बीड

बीड जिल्ह्यात सर्वदूर पिकांचे नुकसान झाले आहे. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीला अक्षरशः नदीचे स्वरूप आले आहे. कापूस नासला आहे तर सोयाबीनवर बुरशी चढली आहे. आता कसं जगायचं हा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांना पडलाय.

संबंधित बातम्या :

Maharashtra Rain LIVE | रत्नागिरी- राजापुरात मुसळाधार पावसानं पूरसदृश्य परिस्थिती

पुण्यात मुसळधार पावसाने घेतला चौघांचा बळी, बाईकसह पाण्याच्या प्रवाहात वाहिले

(Two Small lakes burst in Osmanabad due to heavy rainfall)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.