मुंबई/लखनऊ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज (16 जून) अयोध्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात उद्धव ठाकरेंसह शिवसेनेचे नवनिर्वाचित 18 खासदारांनी अयोध्येत जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेही उपस्थित होते. लोकसभा निवडणुकांपूर्वीही उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या अनेक दिग्गज नेत्यांसह अयोध्या दौरा केला होता. त्यानंतर आज पुन्हा उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जाऊन राम मंदिराबाबत आपली भूमिका ठाम आहे. राम मंदिर हे बनणारच, असं स्पष्ट केलं आहे.