Video : उल्हासनगरच्या बॉडी बिल्डरची जागतिक भरारी! 44व्या वर्षी ‘मिस्टर वर्ल्ड’साठी निवड

वयाच्या 44व्या वर्षी मिस्टर वर्ल्डसाठी नरेश यांची निवड करण्यात आली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

May 27, 2022 | 1:21 PM

ठाणे : इच्छा असली की काहीही अशक्य (Impossible) नाही, असं नेहमी म्हटलं जातं. कोणत्याही वयात (Age) अगदी काहीही शिकता येतं. वयाचं बंधन कशालाही किंवा कुठेही येत नाही. असंच एक सकारात्मक उदाहरण उल्हासनगरमधून (Ulhasnagar) समोर आलंय. उल्हासनगरमधील एका बॉडी बिल्डरची (Body Builder) जागतिक भरारी समोर आली आहे. नरेश नागदेव यांना 23 वर्षांपासून घेत असलेल्या मेहनतीचं फळ मिळालंय. वयाच्या 44व्या वर्षी मिस्टर वर्ल्डसाठी नरेश यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नरेश हे 23 वर्षांपासून घेत असलेल्या मेहनतीचा हा परिपाक आहे. कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी किंवा कोणतही यश साध्य करण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते. मात्र,  मागच्या अनेक वर्षांपासून नरेश हे करत असलेल्या मेहनतीतून त्यांना यश मिळालंय. त्यांचं उदहारण अनेकांसाठी प्रेरणादाई आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें