देवतांच्या जुन्या मूर्ती, फोटोचा प्रश्न सुटणार, ‘संपूर्णम्’ ग्रुप उत्तरपूजा करून आधुनिक पद्धतीने करणार विघटन

शहरातील नर्मदेश्वर महादेव मंदिर अरुणोदय कॉलनी सिडको एन 5 येथे या गोष्टींचे संकलन 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 3 या वेळेत केले जाईल. मूर्ती, फोटो एका बॉक्समध्ये पॅक करून त्यावर आपले नाव, फोन क्रमांक टाकावा.

देवतांच्या जुन्या मूर्ती, फोटोचा प्रश्न सुटणार, 'संपूर्णम्' ग्रुप उत्तरपूजा करून आधुनिक पद्धतीने करणार विघटन
लाकूड आणि पीओपीच्या पावडर पासून अशा वस्तू तयार केल्या जातात
Follow us
| Updated on: Sep 01, 2021 | 11:52 AM

औरंगाबाद: अनेक वर्षांपासून पूजा केलेल्या मूर्ती आणि तसबिरी आपल्या घरात असतात. काही काळानंतर या देवी देवतांची नित्य पूजा करणे शक्य होत नाही. या देवतांना एखाद्या पेटीत ठेवून अडगळीत ठेवले जाते किंवा झाडाखाली, नदीवर, मंदिराबाहेर ठेवून दिले जाते. पण देवतांच्या पूजनाचा हा प्रवास कुठे तरी अर्धवट होत असल्याने त्याला पूर्णत्व देण्याचा उपक्रम संपूर्णम् ग्रुपने (Sampurnam group)  सुरु केला आहे. औरंगाबादमध्ये (Aurangabad City) येत्या 5 सप्टेंबर रोजी अशा मूर्ती आणि फोटोंचे संकलन करण्यात येणार आहे. त्यामुळे तुमच्याही घरात देवतांचे जुने फोटो किंवा जीर्ण मूर्तींचे काय करायचे, असा प्रश्न सतावत असेल, हा उपाय उत्तम ठरेल.

आधी शास्त्रोक्त उत्तरपूजा अन् मग विघटन

आपल्या पूर्वजांनी मोठ्या श्रद्धेने जपलेल्या, पूजलेल्या मूर्ती कुणाच्या हाती देताना, त्याचा अपमान तर होणार नाही, अशी भीती भाविकांच्या मनात असते. मात्र याची काळजीही संपूर्णम् ग्रुपने घेतली आहे. संबंधित मूर्ती किंवा फोटोच्या बॉक्सवर संबंधित घरातील व्यक्तीचे नाव टाकण्याच्या सूचना ग्रुपने दिल्या आहेत. त्या व्यक्तीमार्फत जाणकारांच्या मदतीने देवतांची उत्तरपूजा केली जाते. त्यानंतरच आधुनिक पद्धतीने मूर्तींचे विघटन केले जाते.

गरीब मुलांसाठी भातुकली, पक्ष्यांचे घरटे बनवतात

विशेष म्हणजे देवतांच्या विसर्जनासाठी पर्यावरणपूरक पद्धत वापरली जाते. धातूंच्या मूर्ती वितळवून त्यांचे क्यूब करून इंडस्ट्रीला पाठवल्या जातात. तसेच पीओपीच्या मूर्तींची पावडर करून त्यापासून भातुकली तयार केली जाते. ही भातुकली गरीब मुलांना दिली जाते. तसेच पक्ष्यांना दाणे ठेवण्यासाठीची प्लेटही त्यापासून तयार केली जाते. फोटो फ्रेमममधून कागद बाहेर काढून त्याचा लगदा तयार केला जातो. त्यापासून खत किंवा नवीन कागद बनवला जातो. तसेच लाकडी जाड फ्रेमपासून पक्ष्यांसाठी घरात ठेवतात, ती घरटी तयार केली जातात.

शहरात कुठे आणि कसे होणार संकलन?

या ऊपक्रमात सर्व प्रकारच्या देवांचे मूर्त्या, प्रतिमा, टाक, पितळ, प्लास्टिक, लाकूड, पोथ्या, ग्रंथ, जुन्या लोकांचे फोटो स्वीकारले जातील . प्रतिमा एका खोक्यात / गोणीत आणून देताना त्यावर किंवा आतमध्ये आपले पूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक लिहावा. श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर अरुणोदय कॉलनी सिडको एन 5 येथे या गोष्टींचे संकलन 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 3 या वेळेत केले जाईल. तरीही जास्तीत जास्त नागरिकांनी यास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन ग्रुपतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकतात. औरंगाबाद करीता संपर्क – दिपक मुळे- 98600 53406, प्रिया गुप्ता- 96577 27189, रितु अग्रवाल 77760 33365, निर्मला चौधरी 98230 07333, मंदार देशपांडे- 8484092372

संकल्पना कशी सूचली?

मूळ नाशिकमध्ये स्थापन झालेल्या संपूर्णम् ग्रुपने दोन वर्षांपासून नाशिक, पुणे, मुंबई अशा शहरांमध्ये हा उपक्रम राबवला आहे. यंदा प्रथमच औरंगाबादमध्येही हा उपक्रम राबवला जात आहे. ही कल्पना कशी सूचली, याबद्दल बोलताना ग्रुपच्या अध्यक्षा अॅड. तृप्ती गायकवाड म्हणाल्या, नाशिकमध्ये मी नदीवर गेले असताना तिथे एक व्यक्ती चार-पाच देवांचे फोटो नदीत विसर्जित करण्यासाठी आला होता. देवतांच्या फोटोचं अशा पद्धतीने विसर्जन पाहून मनाला खूप वेदना झाल्या. तेव्हा मी त्याला त्या फोटोतील कागद काढून लगदा करून घरातल्या तुळशीत टाकण्याचा सल्ला दिला. त्यालाही तो पटला. एका व्यक्तीने माझे ऐकले, तर अनेक लोक ऐकू शकतील, असे वाटले आणि मी मित्रांमध्ये हा विषय काढला आणि संपूर्णम् संस्थेचे काम सुरु झाले. (Unique activity of Gods old statue and photo frame disposal in Aurangabad, Maharashtra, Nashik, Mumbai, Pune)

इतर बातम्या: 

Ganesh Chaturthi 2021 : यंदाचा गणेशोत्सवही साधेपणानं, चार फुटांची मूर्ती आणता येणार, पाहा संपूर्ण नियमावली

बाप्पा पावला! गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी रेल्वेच्या आणखी 38 फेऱ्या; रेल्वे फेऱ्यांची संख्या 150वर

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.