योगी सरकारचा मोठा निर्णय, 23 नोव्हेंबरपासून शाळा, कॉलेज सुरु, गाईडलाईन्स जारी

उत्तर प्रदेशमध्ये अखेर आठ महिन्यांनी विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत जाता येणार आहे (Universities and colleges re-open in Uttar Pradesh).

योगी सरकारचा मोठा निर्णय, 23 नोव्हेंबरपासून शाळा, कॉलेज सुरु, गाईडलाईन्स जारी

लखनऊ : उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घोषित केला आहे. योगी सरकारने येत्या 23 नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठ सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्या जवळपास आठ महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. शाळा आणि महाविद्यालये विद्यार्थ्यांना सध्या ऑनलाईन शिक्षण देत आहेत. मात्र, आता अखेर आठ महिन्यांनी विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत जाता येणार आहे (Universities and colleges re-open in Uttar Pradesh).

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अटी-शर्ती

उत्तप प्रदेश सरकारने शाळा, महाविद्यालये 23 नोव्हेंबर पासून सुरु करण्याची घोषणा केली असली तरी त्यासाठी काही अटी-शर्ती देखील जाहीर केल्या आहेत. शाळेत विद्यार्थ्यांची संख्या 50 टक्के असावी, असं सरकारकडून बजावून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे 50 टक्के विद्यार्थी शाळेत तर उर्वरीत विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेतील.

दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने सर्व जिल्हाधिकारी, उच्च शिक्षण संचालक आणि सर्व राज्यांच्या खासगी विद्यापीठांच्या कुलसचिवांना पत्राद्वारे याबाबत माहिती दिली आहे (Universities and colleges re-open in Uttar Pradesh).

केंद्र सरकारनच्या गाईडलाईन्सनुसार उत्तर प्रदेशच्या उच्च शिक्षण विभागाने शाळा, महाविद्यालये उघडण्याबाबत गाईडलाईन्स जारी केले आहेत. या गाईडलाईन्सनुसार विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मास्क, सोशल डिस्टन्सिंग, थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझर आणि हँडवॉश अनिवार्य असेल.

महाराष्ट्रात शाळा कधी उघडणार?

उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रातही शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ सुरु होणार का? असा प्रश्व अनेकांना पडला आहे. कारण महाराष्ट्र सरकारनेही दिवाळीनंतर शाळा सुरु करण्याचे संकेत दिले होते.  दिवाळीनंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगतलं होतं.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रात शाळा दिवाळीनंतरच, शालेय शिक्षण मंत्र्यांचा विद्यार्थी-पालकांना दिलासा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI