मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित, आता पुढे काय?

सचिन पाटील

| Edited By: |

Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

न्यूयॉर्क : भारताने जागतिक स्तरावर मोठा डिप्लोमॅटिक विजय मिळवलाय. जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरला संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीकडून (UNSC) आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलंय. यापूर्वी चीनने या प्रस्तावाला आडकाठी केली होती. पण चीनने त्यांचा आक्षेप मागे घेत भारताच्या वतीने आलेल्या या प्रस्तावाला पाठिंबा दिला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन आणि रशियाने याअगोदरच […]

मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित, आता पुढे काय?
Follow us

न्यूयॉर्क : भारताने जागतिक स्तरावर मोठा डिप्लोमॅटिक विजय मिळवलाय. जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरला संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीकडून (UNSC) आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलंय. यापूर्वी चीनने या प्रस्तावाला आडकाठी केली होती. पण चीनने त्यांचा आक्षेप मागे घेत भारताच्या वतीने आलेल्या या प्रस्तावाला पाठिंबा दिला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन आणि रशियाने याअगोदरच या प्रस्तावासाठी पुढाकार घेतला होता. पण चीनने तांत्रिक कारण दाखवत आडकाठी केली होती.

मसूद अजहरला दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताला जवळपास दहा वर्षे वाट पाहावी लागली. यापूर्वी 2009, 2016, 2017 आणि मार्च 2019 मध्येही प्रस्ताव आणण्यात आला होता. पण चारही वेळा चीनने ‘विटो’चा वापर केला आणि मसूदला वाचवलं. पण मोदी सरकारने सातत्याने जगभरातील महाशक्तींसोबत संपर्कात राहून आंतरराष्ट्रीय दबाव वाढवला आणि चीनला या दबावापुढे झुकावं लागलं.

यूएनएससीमध्ये आतापर्यंत मसूदसाठी चार प्रस्ताव

भारताने यूपीए सरकारच्या काळात मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव आणला होता. हा प्रस्ताव आणणारा भारत तेव्हा एकटाच देश होता.

2016 मध्ये पठाणकोट हल्ल्यानंतर भारताने संयुक्त राष्ट्र समितकडून मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावं यासाठी प्रस्ताव आणला. पण यावेळी चीनने विटोचा वापर केला आणि प्रस्ताव मागे पडला.

2017 मध्ये संयुक्त राष्ट्राने मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी सुरक्षा समितीसमोर प्रस्ताव आणला. पण चीनने विटोचा वापर केला.

मार्च 2019 मध्ये यूएनएससीने स्वतःहून मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी प्रस्ताव आणला. याला यूएनएससीमधील पाचपैकी रशिया, ब्रिटन, अमेरिका आणि फ्रान्स या चार देशांचा पाठिंबा होता. पण चीनने तांत्रिक कारण दाखवत या प्रस्तावाला विरोध केला.

मसूद अजहरवर आता काय कारवाई?

मसूद अजहर सध्या पाकिस्तानमध्ये आहे. पाकिस्तानने पुलवामा हल्ल्यानंतर त्याला नजरकैदेत ठेवलं असल्याची माहिती आहे. पण त्याला आता इस्लामाबादमधील सेफ हाऊसमध्ये हलवण्यात आलंय. यूएनएससीकडून आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित झाल्यानंतर त्याच्यावर कोणती कारवाई होणार हे स्पष्ट नसलं तरी आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित होणं हीच एक मोठी गोष्ट मानली जाते. कारण, यूएनएससीच्या काही तरतुदी आहेत, ज्यानुसार पुढील कारवाई होते.

यूएनएससीच्या नियमानुसार, मसूद अजहरची संपत्ती तातडीने जप्त केली जाईल. शिवाय त्याचे पैशांचे स्रोतही बंद केले जातील.

संयुक्त राष्ट्राचा सदस्य असलेल्या कोणत्याही देशात मसूद अजहरला जाता येणार नाही.

मसूदला कोणत्याही प्रकारची शस्त्र खरेदी करता येणार नाही. शिवाय त्याच्या संघटनेवर बंदी घातली जाईल. जैश ए मोहम्मदचा भारतातील अनेक हल्ल्यांमध्ये सहभाग आहे.

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI