एसबीआयचे डेबिट कार्ड वापरताय? मग या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा कार्ड होऊ शकते ब्लॉक !

बँकेने सांगितले की ही संपूर्ण प्रक्रियेसाठी 10-15 दिवस लागतात आणि ते आपल्या पत्त्यावर देखील अवलंबून असते. (Use SBI debit card, Then remember these things, otherwise the card may be blocked)

नवी दिल्ली : जर आपले स्टेट बँक इंडियामध्ये बँक खाते असेल आणि नवीन डेबिट कार्डसाठी अर्ज केला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. त्याचबरोबर एसबीआयच्या इतर खातेदारांनाही बँकेचे हे नियम माहित असणे आवश्यक आहे जेणेकरून आपण भविष्यात डेबिट कार्डसाठी अर्ज केल्यास आपल्याला अडचण होणार नाही. आपण नेहमी पाहतो की, जेव्हा आपण नवीन डेबिट कार्डसाठी अर्ज करता तेव्हा बँकेकडून एक कन्फर्मेशन येते की, आपले कार्ड पाठवले आहे, मात्र आपल्याला प्राप्त होत नाही. अलिकडेच, एका ग्राहकालाही अशाच प्रकारची समस्या भेडसावत होती, त्यानंतर ग्राहकांनी बँकेला टॅग केले आणि सोशल मीडियावर विचारले की, एटीएम डिस्पॅच केल्यानंतर डिलिव्हरी होण्यास किती वेळ लागेल. यावर एसबीआयने ट्विटरवरच माहिती दिली असून एटीएम न मिळाल्यास काय करावे हे सांगितले आहे. (Use SBI debit card, Then remember these things, otherwise the card may be blocked)

काय आहेत बँकेचे नियम?

एसबीआयने म्हटले आहे की डेबिट कार्ड इंडिया पोस्टद्वारे वितरीत केले जाते. तसेच बँकेने असा सल्ला दिला आहे की अशा प्रकारच्या डिलिव्हरीबद्दल जाणून घेण्यासाठी पोस्ट ऑफिसशी संपर्क साधला पाहिजे. जर पोस्ट ऑफिसद्वारे डिलिव्हरी केली गेली नसेल किंवा ती रिटर्न म्हणून चिन्हांकित केली गेली असेल तर ती सुरक्षेच्या दृष्टीने ब्लॉक करण्यासाठी बँकेत पाठविली जाईल. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर हे कार्ड ग्राहकांच्या शाखेत पाठवले जाते, तेथून ग्राहक ते कलेक्ट करू शकतात. बँकेने सांगितले की ही संपूर्ण प्रक्रियेसाठी 10-15 दिवस लागतात आणि ते आपल्या पत्त्यावर देखील अवलंबून असते. बँकेच्या ट्वीटनुसार, तुम्हाला असे झाल्यास तुमची केवायसी कागदपत्रे व पासबुक घेऊन बँक शाखेत जा आणि एटीएम कार्ड कलेक्ट करा.

बँकेतून कट होताहेत पैसे

एसबीआयच्या अनेक खात्यांमधून पैसे वजा केले जात आहेत आणि एसबीआयकडून पैसे डेबिट केले जात आहेत. होय, एसबीआयकडून तुमच्या खात्यातून सर्विस चार्ज 147 रुपये वजा केले जात आहेत. बँक एटीएम किंवा डेबिट कार्डसाठी मेंटेनन्स चार्ज वजा करते. हे शुल्क बँकेच्या वतीने दरवर्षी बँकेच्या खात्यातून वजा केले जाते. बँकेने स्वतः ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिली असून बँकेच्या वतीने शुल्क म्हणून 147.50 रुपये वजा केल्याचे म्हटले आहे. (Use SBI debit card, Then remember these things, otherwise the card may be blocked)

इतर बातम्या

सावधान! LIC मधले आपले पैसे बुडण्याची शक्यता, पैसे हवे असल्यास आताच करा हे काम

‘या’ 18 जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद, यादी जारी; तुमचाही जिल्हा आहे का? पटापट तपासा!