मुलांनी हाफ पँट घालू नये, उत्तर प्रदेशातील खाप पंचायतीचा फतवा

बालियान खाप पंचायतचे प्रमुख नरेश टिकैत यांनी मुलांनी हाफ पँट घालू नये असा फतवा काढला आहे.

मुलांनी हाफ पँट घालू नये, उत्तर प्रदेशातील खाप पंचायतीचा फतवा

लखनौ : महिलांच्या वेशभूषेबद्दल निघणारे अजब फतवे नवीन नाहीत. महिलांनी जीन्स घालू नये, फॅशनेबल कपडे परिधान करु नयेत, गुडघे दिसणारी वस्त्रं घालू नयेत, असे आदेश अनेक खाप पंचायतींनी दिल्याचे ऐकिवात आहे. मात्र आता मुलांसाठी बालियान खाप पंचायतीने फतवा काढला आहे. मुलांनी हाफ पँट घालू नयेत, असं फर्मान सोडण्यात आलं आहे. (Uttar Pradesh Baliyan Khap Panchayat orders men not to wear Half Pants in market)

बालियान खाप पंचायतचे प्रमुख आणि भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी हा फतवा काढला आहे. बागपतमध्ये असताना नरेश टिकैत म्हणाले की, मुलांनी बाजारात ‘अर्धी चड्डी’ घालून फिरु नये. आजकाल ग्रामीण भागातील मुले, तरुण पिढी हाफ पँट घालतात, पण हे चांगले दिसत नाही. वडीलधाऱ्यांनी सांगितले की यावर बंदी घाला, हे योग्य नाही, असे नरेश टिकैत म्हणाले. ‘न्यूज 18’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

“यापूर्वीही आम्ही मुलींना जीन्स घालण्यास प्रतिबंध केला होता. आम्ही यशस्वी झालो, मुली-महिला सहमत होत्या. आम्ही 90 टक्के यशस्वी ठरलो. कोणी थोडासा विरोध केला, आम्हाला सांगितलं गेलं की जर आम्ही मुलांवरही बंधनं घातली पाहिजेत. त्यामुळे मुलांना आम्ही हाफ पँट न घालण्यास सांगितले” असे टिकैत यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील निकिता तोमर हत्याकांड गाजत आहे. “जोपर्यंत ठोस कायदे होत नाहीत, तोपर्यंत छेडछाड थांबणार नाही. ज्याप्रकारे ही हत्या करण्यात आली त्याची देशभर चर्चा होत आहे. सरकार कारवाई करत आहे, परंतु अधिक कठोर पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. (Uttar Pradesh Baliyan Khap Panchayat orders men not to wear Half Pants in market) आमच्या मुली शाळेत जात आहेत, त्यांची छेडछाड केली जात आहे. फाशीपेक्षा कमी शिक्षा होऊ नये, अशी अपेक्षा टिकैत यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या :

जीन्स-टीशर्ट घातल्याने बायकोचा जीव घेण्याचा प्रयत्न, डोंबिवलीत तरुणाला अटक

(Uttar Pradesh Baliyan Khap Panchayat orders men not to wear Half Pants in market)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI