विकासाच्या आड येणारांना बाटलीत बंद करुन समुद्रात बुडवू : पंकजा मुंडे

सचिन पाटील

| Edited By: |

Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

बीड : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा बालेकिल्ला असलेल्या बीडमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकासकामांचं भूमीपूजन करण्यात आलं. विकासाच्या आड येतील त्यांना बाटलीत बंद करुन, मुंबईच्या अरबी समुद्रात नेऊन बुडवू, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी शिवसंग्राम आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर नाव न घेता निशाणा साधला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचं आयोजन बीड नगरपालिकेच्या वतीने […]

विकासाच्या आड येणारांना बाटलीत बंद करुन समुद्रात बुडवू : पंकजा मुंडे
Follow us

बीड : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा बालेकिल्ला असलेल्या बीडमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकासकामांचं भूमीपूजन करण्यात आलं. विकासाच्या आड येतील त्यांना बाटलीत बंद करुन, मुंबईच्या अरबी समुद्रात नेऊन बुडवू, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी शिवसंग्राम आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर नाव न घेता निशाणा साधला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचं आयोजन बीड नगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं होतं.

बीड येथील मल्टी पर्पज ग्राऊंडवर मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन बटण दाबून सर्व विकास कामांचं उद्घाटन केलं. कार्यक्रमासाठी पंकजा मुंडेंसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयदत्त क्षीरसागर, अण्णासाहेब पाटील मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, भाजप आमदार सुरेश धस, आमदार विक्रम काळे, आमदार आर. टी. देशमुख, आमदार भीमराव धोंडे, विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा, सभापती संतोष हंगे, नगराध्यक्ष सहाल चाऊस, माजी आमदार नाना दरेकर, माजी मंत्री बदामराव पंडित आणि नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांची उपस्थिती होती.

बीड जिल्ह्याच्या खंबीरपणे पाठीशी : मुख्यंमंत्री

बीड शहराचं नाव राज्याच्या पातळीवर नेण्याचं काम काकु-नाना यांनी केलं. त्यांचाच वारसा भक्कमपणे जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी चालवला आहे. बीड जिल्हा हा आमच्या गोपीनाथरावांचा जिल्हा असून बीड शहर हे जिल्ह्याचं मुख्यालय असल्यामुळे मुख्यालय सुसज्ज करण्यासाठी मी कटीबध्द आहे, याशिवाय मुंडे साहेबांच्या स्वप्नातील विकासाचे केंद्रबिंदू बीड जिल्हा ठरावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकार पंकजाताई आणि बीड जिल्ह्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. शिवाय दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांसाठी भरघोस मदत आली असून ती लाभार्थ्यांपर्यंत जाईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य

पंकजा मुंडे यांनी त्यांच्या भाषणात सूचक वक्तव्य केलं. त्या म्हणाल्या, राजकारणातले विविध तारे मी एका मंचावर आणले आहेत. मुख्यमंत्री याबद्दल मला नक्कीच पुरस्कार देतील. मात्र रक्ताचे नाते वैरी व्हावेत असं राजकारण कधी केलं नाही. पण ते भोगलंय. त्यामुळेच मुंडे साहेबांच्या विचारावर आम्ही बीड जिल्ह्यात विकासाचं राजकारण करत आहोत. आम्ही जयदत्त क्षीरसागरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर आजपर्यंत कायमचे होते. पण पुढे भविष्यात त्यांना जागा बदलावी लागेल. नवीन जबाबदारी घ्यावी लागेल, असं सूचक वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं.

दरम्यान, बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाने जाळे विणले असून हे सरकार मागास जिल्ह्याचा चेहरा विकासाने बदलल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असंही पंकजा म्हणाल्या. येत्या मार्च महिन्यापर्यंत बीड जिल्ह्यात सगळीकडे रस्त्यांचे प्रकल्प पूर्ण होतील, असंही त्यांनी सांगितलं.

बीड जिल्ह्यातील पुरस्कार विजेत्यांचा गौरव

पद्मश्री मिळालेल्या गोरक्षक शब्बीर मामू यांच्यासह नाट्यरंगकमी वामन केंद्रे आणि सुवर्णपदक पटकावलेल्या कुस्तीपटू राहुल आवारेचा सत्कार यावेळी करण्यात आला.

कोणकोणत्या विकासकामांचा शुभारंभ?

नगर परिषद बीडच्या अमृत भूयारी गटार योजना, मराठवाड्यातील पहिल्या निवारा गृहाचे लोकार्पण, नगरोत्थान अंतर्गत सोळा डी. पी.रस्ते कामाचे भूमीपूजन, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 448 घराच्या निर्मितीचा शुभारंभ, नगर पालिका सभागृहाचे लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे सभागृह नामकरण.

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI