AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देव तारी त्याला कोण मारी! भूकंपानंतर ढिगाऱ्याखाली 18 दिवसांचं बाळ अडकलं, रडण्याच्या आवाजामुळे आईचाही जीव वाचला

venezuela earthquake : व्हेनेझिएलामध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपाने सर्वत्र खळबळ माजली आहे. या भूकंपातून एका १८ दिवसांचा चिमुकला चमत्कारिकरित्या वाचला.

देव तारी त्याला कोण मारी! भूकंपानंतर ढिगाऱ्याखाली 18 दिवसांचं बाळ अडकलं, रडण्याच्या आवाजामुळे आईचाही जीव वाचला
venenzia earthquake
| Updated on: Jun 27, 2026 | 12:41 PM
Share

व्हेनेझुएलाच्या उत्तर भागात बुधवारी झालेल्या दोन शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्याने खळबळ माजली आहे. आतापर्यंत या आपत्तीत 920 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 3000 हून अधिक जण जखमी झाले आहेत. एका अहवालानुसार, अद्याप जवळपास 70,000 हून अधिक जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. रस्त्यावर कोसळलेल्या बहुमजली इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण दबले गेले आहेत. प्रशासन आणि त्यांच्या नातेवाईकांकडून शोध सुरू आहे. या आपत्तीदरम्यान एका ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 18 दिवसांच्या मुलाला देखील यशस्वीरित्या बाहेर काढण्यात यश आलं आहे. या बाळाच्या रडण्याच्या आईचा देखील वाचला आहे. या चमत्कारिक घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.

ला गुआरा या भागात एक 8 मजली इमारत भूकंपाच्या धक्क्याने कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली एक 18 दिवसांचा चिमुकला देखील अकडला. या बाळाला वाचवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरु केले होते. परंतु १२ तासांनंतरही बाळ सापडत नव्हते. परंतु त्यानंतरही प्रशासनाचे मदतीचे कार्य सुरूच होते. परंतु अचानक सकाळी बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यानंतर बचाव पथकाच्या जवानांनी तातडीने ढिगारा हटवला. त्यावेळी १८ दिवसांच्या चिमुकल्यासोबत आई देखील आढळून आली.

बचाव पथकाचे जवान आणि स्वयंसेवकांनी शुक्रवारी आई आणि बाळाला सुरक्षितपणे बाहेर काढलं. इमारतीचा ढिगारा अंगावर कोसळूनही बाळ आणि त्याच्या आईला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नव्हती. या दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

४ वर्षांचा मुलगाही बचावला

ला गुआरा भागातच एक सात मजली इमारत देखील कोसळली. या घटनेवेळी जोस अल्बार्टो हे घरापासून लांब होते. या घटनेची माहिती मिळताच इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मुलगा, सून आणि नातवाला शोधायला आले. वाहन न मिळाल्याने चालतच घटनास्थळी पोहोचले. ते मोठ्या ओरडून कुटुंबातील सदस्यांना शोधत होते. शोधत असताना अचानक त्यांना मुलाचा आवाज आला. त्यांच्या कुटुंबातील सदस्य संपूर्ण २४ तास इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकून बसलं होतं. जोस यांनी बचाव पथकाच्या मदतीने कुटुंबातील सदस्यांचे प्राण वाचवले. कुटुंबातील सदस्यांमध्ये ४ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे.

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल