बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाची माती घेऊन विक्रम प्रताप सिंग अयोध्येत!

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाची माती घेऊन विक्रम प्रताप सिंग अयोध्येत पोहोचले. शरयू तीरावर दिवे लावण्यात येतील. (Vikram Pratap Singh at Ayodhya)

बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाची माती घेऊन विक्रम प्रताप सिंग अयोध्येत!


अयोध्या (उत्तर प्रदेश) : मीरा भाईंदर महापालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि जिल्हाध्यक्ष विक्रम प्रताप सिंग हे अयोध्येत (ayodhya ram temple) दाखल झाले आहेत. स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाची माती घेऊन विक्रम प्रताप सिंग अयोध्येत पोहोचले. शरयू (Saryu) तीरावर ही माती ठेऊन त्यासमोर 492 दिवे लावणार आहेत. (Vikram Pratap Singh at Ayodhya)

“राममंदिराचं भूमिपूजन होत असल्यानं बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार झालं आहे. त्यानिमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील अयोध्येला तीन वेळेस येऊन गेले आहेत. त्यामुळे राम मंदिरात शिवसेनेनचं योगदान खूप मोठं आहे. त्यासाठी शिवसेना आपल्या पद्धतीनं मंदिराच्या भूमिपूजनाचा आनंद व्यक्त करणार आहे”, असं विक्रम प्रताप सिंग यांनी सांगितलं.

मीरा भाईंदर महापालिका नगरसेवक आणि जिल्हाध्यक्ष विक्रम प्रताप सिंह यांनी राम मंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपालदास महाराज यांची त्यांच्या अयोध्येतील आश्रमात भेट घेतली. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे दूत म्हणून विक्रम प्रताप सिंह अयोध्येत आले आहेत. (Vikram Pratap Singh at Ayodhya)

उद्धव ठाकरे यांचे राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा देणारे पत्र त्यांनी नृत्य गोपालदास महाराज यांना सुपूर्द केलं. या पत्रात शिवसेना ट्रस्ट तर्फे मंदिर निर्माणासाठी एक कोटी रुपयांचा निधी दिल्याचा तपशील नमूद करण्यात आला आहे.

देशभरातून पवित्र जल-माती अयोध्येत

राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी देशाच्या विविध कानाकोपर्‍यातून पवित्र जल आणि माती अयोध्येत आणली जात आहे. यासोबतच अध्यात्मिक आणि धार्मिक महत्व असलेल्या वस्तूही राम जन्मभूमी ट्रस्टकडे सुपूर्द केल्या जात आहे. बद्रिनाथहून या भूमिपूजनासाठी कल्पवृक्षाचे फळ घेऊन स्वामी शंखवल्लभ अयोध्येत दाखल झाले आहे. शंखवल्लभ यांच्याकडून भूमिपूजनापूर्वी 11 हजारवेळा शंखनाद केला जाणार आहे.

संबंधित बातम्या 

“राम मंदिर भूमिपूजनाचा दिवस बदला, अन्यथा जीवे मारु”, मुहूर्त सांगणाऱ्या पुजाऱ्याला धमकी