घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 147 तोळे सोन्यासह 25 लाखांचा ऐवज जप्त, विरार पोलिसांची कारवाई

दरोडेखोरांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात विरार पोलिसांना यश आले आहे. यात दोन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 25 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 147 तोळे सोन्यासह 25 लाखांचा ऐवज जप्त, विरार पोलिसांची कारवाई
| Updated on: Oct 11, 2020 | 12:35 AM

वसई-विरार : वसई-विरार नालासोपारा क्षेत्रात चोरी, दरोडा, घरफोडीमध्ये (Virar Police Arrest 2 Robbers) दिवसागणिक वाढ होत आहे. विरारमध्ये दरोडा टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे लंपास झाले होते. याच दरोडेखोरांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात विरार पोलिसांना यश आले आहे. यात दोन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 25 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे (Virar Police Arrest 2 Robbers).

या प्रकरणी विरार पोलिसांनी इब्राहिम बदुद्दीन शेख (वय 35) आणि छेदू उर्फ सिद्धू भैयालाल राजपूत या दोघांना अटक केली होती. हे दोघेही पण सराईत चोरटे आहेत. 1 ऑक्टोबर रोजी विरार पश्चिमेच्या यशवंत नगर येथे या दोघांनी दरोडा टाकून जवळपास 32 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला होता.

विरार पोलिसांनी मोठ्या शितापीने या दोघांना अटक करुन 147 तोळे सोने, चांदी आणि 15 हजार रुपये कॅश असा एकूण 25 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल या दोघांकडून हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी यांना बेड्या ठोकल्या आहेत.

Virar Police Arrest 2 Robbers

संबंधित बातम्या :

दारु चढली; अंबरनाथमध्ये क्षुल्लक वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या

लॉकडाऊनमध्ये रात्री उशिरापर्यंत डान्सबार सुरु, पोलिसांचा छापा, तळघरातून 11 मुलींची सुटका