AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरात लॉकडाऊनमध्ये सायबर गुन्ह्यात मोठी वाढ, महिला सॉफ्ट टार्गेट

नागपुरात लॉकडाऊनच्या काळात सायबर गुन्ह्यांमध्ये 25 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Cyber crime rises by 30 per cent in Nagpur during lockdown)

नागपुरात लॉकडाऊनमध्ये सायबर गुन्ह्यात मोठी वाढ, महिला सॉफ्ट टार्गेट
| Updated on: Oct 10, 2020 | 8:55 PM
Share

नागपूर : नागपुरात लॉकडाऊनच्या काळात सायबर गुन्ह्यांमध्ये (Cyber crime) लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे. नागपूरमध्ये  सायबर क्राईममध्ये 25 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. तसेच या गुन्ह्यामंध्ये महिलांना सॉफ्ट टार्गेट केलं जात असल्याचंही धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. यामध्ये सर्वाधिक गुन्हे हे फसवणूक, बँकिंग फ्रॉड, अकाऊंट हॅकिंग, नेट बँकिंग अशा सायबर गुन्ह्यांचा समावेश आहे. (Cyber crime rises by 30 per cent in Nagpur during lockdown)

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले होते. राज्य सरकारने गरज असेल तरच बाहेर पडण्याचे आवाहन यावेळी केलं होते. तसेच आर्थिक व्यवहार जास्तीत जास्त डिजीटल पद्धतीने करण्याचे आवाहन देखील केले जात होते. याच संधीचा फायदा नागपुरात सायबर गुन्हेगारांनी घेतल्याचं दिसतंय. लॉकडाऊनच्या काळात फेक कॉल्स, फेसबूक, व्हॉट्सअ‌ॅपच्या माध्यमातून सर्वाधिक फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे.

दहा महिन्यात अठराशे गुन्ह्यांची नोंद

नागपुरात कोरोना काळात सायबर क्राईममध्ये मोठी वाढ झाली आहे. 2019 मध्ये नागपुरात सायबर क्राईमचे एकूण 1502 गुन्हे नोंदवण्यात आले. तर, या यावर्षी केवळ दहा महिन्यांत हा आकडा 1800 पर्यंत वाढला आहे. यामध्ये फेसबूक आणि व्हॉट्सअ‌ॅपच्या मदतीने गुन्हेगारांनी सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर डल्ला मारण्याचे प्रमाण अधिक आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत फेसबूक आणि व्हॉट्सअ‌ॅपच्या मदतीने फसवणूक करण्याच्या गुन्ह्यात 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर फेक बॅंक कॉलच्या माध्यमातून देखील सायबर गुन्हेगारांनी अनेकांना लुटले आहे.

सायबर क्राईममध्ये महिला सॉफ्ट टार्गेट

नागपुरात सायबर क्राईममध्ये महिलांना सॉफ्ट टार्गेट केलं गेलं आहे. त्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. फेक कॉल्सच्या माध्यमातून महिलांना जास्त प्रमाणात लुटण्यात आलं आहे. फेक कॉल करुन फसवेगिरी करण्याचे प्रमाण हे 18 टक्के आहे. महत्त्वाचं म्हणजे व्हॉट्सअ‌ॅप आणि फेसबुक मेसेंजरमार्फत धमकावणे, लुबाडणे आणि ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे.

दरम्यान, सायबर क्राईममध्ये (Cyber crime ) वाढ झाल्याचे लक्षात आल्यानंतर नागपूर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच पोलिसांनी इंटरनेटच्या माध्यमातून समाजमाध्यमांवर कायम सक्रिय राहणाऱ्यांना  काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच फसवणुकीचा प्रकार घडल्यास तत्काळ पोलिसांना कळवण्याचंही आवाहन केलं आहे.

संबंधित बातम्या :

Curfew Updates | सायबर क्राईम अंतर्गत मुंबईत 24 तासात 20 जणांवर गुन्हे दाखल

सायबर क्राईम पोलिसांकडे ‘नो टाईम’, पीडितांची फरफट?

एटीएम बदलण्याच्या नावे लुटालूट, सायबर चोरट्यांचा सुळसुळाट

(Cyber crime rises by 30 per cent in Nagpur during lockdown)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.