AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाणे जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, बारवी धरण हाऊसफुल

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे बारवी धरण जुन्या क्षमतेनुसार भरून वाहू लागले आहे. यामुळे ठाणेकरांना वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

ठाणे जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, बारवी धरण हाऊसफुल
| Updated on: Jul 30, 2019 | 8:25 AM
Share

ठाणे : ठाणे जिल्ह्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे बारवी धरण जुन्या क्षमतेनुसार भरून वाहू लागले आहे. यामुळे ठाणेकरांना वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाणे, बदलापूर, नवी मुंबई या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे बदलापूरजवळ असलेले बारवी धरण 100 टक्के भरुन वाहू लागले आहे. या धरणातून अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, ठाणे मीरा भाईंदर यासारख्या मुख्य शहरांबरोबरच औद्योगिक वसाहतीना पाणी पुरवठा केला जातो.

बारवी धरणाच्या जुन्या क्षमतेनुसार हे धरण शंभर टक्के भरलं आहे. काल संध्याकाळी 5 च्या  सुमारास हे धरण काठोकाठ भरुन वाहू लागले. बारवी धरणाची पूर्वीची क्षमता ही 68.60 मीटर होती. त्यानंतर नुकतंच या धरणाची उंची 4 मीटरने वाढवण्यात आली असून ती 72.60 मीटरपर्यंत करण्यात आली आहे.

त्यामुळे यंदा बारवी धरणात अतिरिक्त पाणी साठा जमा होणार आहे. तसेच धरणाच्या पाणी साठवण क्षमता 234  दश लक्ष घनमीटर इतकी होती. आता ही क्षमता वाढून 340.48 दशलक्ष घनमीटर इतकी होणार आहे .

Follow Us
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार.
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी.
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......