साताऱ्यातील मोरे गल्लीत शस्त्रसाठा, 55 बंदुका जप्त

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM

पाटण (सातारा) : पाटणमधील मोरे गल्लीत छापा मारुन पाटण पोलिसांनी विनापरवाना साठा केलेल्या 55 सिंगल आणि डबल बोअरच्या बंदुकांचा शस्त्रसाठा जप्त केला. पोलीस उपअधीक्षक अंगद जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या शस्त्रसाठा जप्तीच्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पाटणमधील प्रकाश शंकर यादव याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटण येथे प्रकाश शंकर यादव यांचा […]

साताऱ्यातील मोरे गल्लीत शस्त्रसाठा, 55 बंदुका जप्त
प्रातिनिधिक फोटो

पाटण (सातारा) : पाटणमधील मोरे गल्लीत छापा मारुन पाटण पोलिसांनी विनापरवाना साठा केलेल्या 55 सिंगल आणि डबल बोअरच्या बंदुकांचा शस्त्रसाठा जप्त केला. पोलीस उपअधीक्षक अंगद जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या शस्त्रसाठा जप्तीच्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पाटणमधील प्रकाश शंकर यादव याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटण येथे प्रकाश शंकर यादव यांचा परवाना असलेले बंदूक विक्री दुरुस्तीचे दुकान आहे. उपअधीक्षक जाधवर यांनी  दुकानाला भेट देऊन पाहणी केली असता. यादवने मोरे गल्लीतील आपल्या घरात अनधिकृतपणे शस्त्रसाठा करून ठेवल्याचे उघड झाले. त्याच्याकडून 55 सिंगल आणि डबल बोअरच्या बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत.

अनधिकृत शस्त्रसाठाप्रकरणी 6 महिने कैद व 2 हजार रुपयांची शिक्षा होऊ शकते. त्यानुसार 30 आर्म अ‍ॅक्टनुसार पोलिसांनी कारवाई केली असून, या कारवाईत जाधवर यांच्यासमवेत पाटणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भापकर, स्वामी, सहाय्यक फौजदार भरते, पी. एन. निगडे, पोलीस कॉन्स्टेबल भगले यांनी भाग घेतला.

संबंधित बातमी : धनंजय कुलकर्णीच्या दुकानात 170 शस्त्रं, प्लॅन काय होता?

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI