AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

#Chandrayaan2 : भारतासाठी मोठा दिलासा! विक्रम लँडरचा शोध लागला, संपर्कासाठी प्रयत्न

चंद्रयान 2 चे ऑर्बिटरने याबाबतचा एक फोटो पाठवला असून त्यात विक्रम लँडर दिसत असल्याचे अध्यक्षांनी म्हटलं आहे.

#Chandrayaan2 : भारतासाठी मोठा दिलासा! विक्रम लँडरचा शोध लागला, संपर्कासाठी प्रयत्न
| Updated on: Sep 08, 2019 | 2:17 PM
Share

Mission Chandrayaan 2 बंगळुरु : भारताची महत्त्वाकांक्षी ‘चंद्रयान 2’ (Chandrayan 2) मोहीम अगदी शेवटच्या टप्प्यात असताना विक्रम लँडरचा इस्रो (ISRO) संपर्क (Vikram Lander crashed on moon surface) तुटला. त्यानंतर इस्रोचे शास्त्रज्ञ (Mission Chandrayaan 2) पुन्हा एकदा जोमात कामाला लागले आणि त्यांनी विक्रम लँडरचा शोध घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा कोट्यवधी भारतीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

इस्रो प्रमुख के. शिवन यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, “नुकतंच आम्हाला विक्रम लँडर नेमकं कुठे आहे याचा शोध लागला आहे. चंद्रयान 2 चे ऑर्बिटरने याबाबतचा एक फोटो पाठवला असून त्यात विक्रम लँडर दिसत असल्याचे प्रमुखांनी म्हटलं आहे. मात्र अद्याप विक्रम लँडरची इस्रोचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. मात्र लवकरच आम्ही विक्रम लँडरशी संपर्क साधू,” असे के. शिवन यांनी सांगितले आहे.

‘चंद्रयान 2’ सात सप्टेंबर 2019 च्या मध्यरात्री एक वाजून 55 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग (Soft Landing on Lunar Surface) करणार होतं. 30 किलोमीटर अंतरावर स्थिरावलेल्या लँडरने चंद्राच्या दिशेने कूच करताना ‘रफ ब्रेकिंग फेस’ (Rough Breaking Phase) या अडथळ्यावरही मात केली. मात्र चंद्रापासून अवघ्या 2.1 किलोमीटर अंतरावर असताना ‘विक्रम’चा इस्रोच्या ग्राऊण्ड स्टेशनशी संपर्क (Vikram lander connection lost) तुटला.

‘चंद्रयान 2’चा ऑर्बिटर 100 किलोमीटर अंतरावर असून आधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे. चंद्राभोवती फेऱ्या घालून ऑर्बिटरही बरीचशी माहिती गोळा करणार आहे.

चंद्रापासून अवघ्या 2.1 किलोमीटर अंतरावर असताना विक्रम लँडर संपर्काबाहेर गेल्यानंतर या मोहिमेची सर्व जबाबदारी ऑर्बिटरवर आली. त्यानुसार या ऑर्बिटरने आपली जबाबदारी अगदी चोख निभावली असून त्याने टिपलेले काही फोटो त्याने इस्रोकडे पाठवले. यातील फोटोद्वारे विक्रम लँडरचा शोध लागला आहे.

चंद्रयान 2 मोहीमेत विक्रम लँडरचा संपर्क तुटल्यानंतर 20-20 तास काम करणाऱ्या शास्त्रज्ञांचा हिरमोड झाला. परंतु इस्रोने अपेक्षा सोडलेली नव्हती. कारण, आकडेवारीचं विश्लेषण सध्या केलं जात असून लवकरच याबाबत घोषणा केली जाईल.

चमत्कारिकरित्या विक्रम लँडरशी संपर्क झाल्यास भारताच्या नावावर नव्या इतिहासाची नोंद होईल. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा रशिया, यूएस आणि चीननंतर चौथा देश ठरणार आहे. मात्र आजवर कधीही समोर न आलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचं मिशन आखणारा भारत हा एकमेव देश आहे.

चंद्रयान 2 चे तीन भाग

चंद्रयान 2 अंतरिक्ष यानाचे तीन खंड आहेत. ऑर्बिटर (2,379 किलोग्राम, आठ पेलोड), विक्रम (1,471 किलोग्राम, चार पेलोड) आणि प्रज्ञान (27 किलोग्राम, दोन पेलोड)

विक्रम 2 सप्टेंबरला ऑर्बिटरपासून वेगळा झाला होता. चंद्रयान 2 ला 22 जुलै रोजी भारताच्या हेमी रॉकेट जिओसिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हिकल-मार्क 3 च्या (जीएसएलवी एमके 3) माध्यमातून लाँच केले होते.

संबंधित बातम्या

Mission Chandrayaan 2 : एक वर्षापर्यंत चंद्राचे फोटो ‘ऑर्बिटर’ पाठवणार

चंद्रयान 2 : यश मिळालं तर आपलं, अपयश आलं तरीही आपलंच, इस्रोच्या 2 रॉकेट वुमनचा देशाला अभिमान

‘चंद्रयान-2’चं नेतृत्व करणाऱ्या महिला शास्त्रज्ञांना अक्षय कुमारच्या शुभेच्छा

Chandrayaan-2 चंद्राच्या उंबरठ्यावर, मध्यरात्री ‘चंद्रयान 2’चं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग, भारत ‘विक्रम’ रचणार

Mission Chandrayaan-2 : ‘चंद्रयान-2’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरच का उतरणार

Mission Chandrayaan-2 : मिशन ‘चंद्रयान 2’ फतेह, चंद्रयान अवकाशात झेपावलं 

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या