शाहरुख खानसोबत सामना पाहण्यासाठी बसलेला हा तरुण कोण?

शाहरुख खानसोबत सामना पाहण्यासाठी बसलेला हा तरुण कोण?

चेन्नई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा तामिळ दिग्दर्शक एटलीसोबतचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो चेन्नईच्या MA चिदंबरम आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममधला आहे. फोटोमध्ये शाहरुख आणि एटली एकत्र आयपीएल सामना बघत आहेत. या फोटोनंतर शाहरुख खान एटलीच्या चित्रपटात काम करणार आहे. त्यासंदर्भात चर्चा झाल्याचे म्हटलं जात आहे. तसेच दिग्दर्शक एटलीच्या स्कीन रंगावरुन तो सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

दरम्यान, एटलीच्या रंगावरुन सुरु असलेल्या ट्रोल्सला एटलीच्या चाहत्यांनी ट्रोल्स करणआऱ्या युजर्सला आक्रमकपणे उत्तर दिलं आहे. एटलीचे चाहते म्हणाले, “एटलीच्या स्कीन रंगावरुन टीका करु नका, त्याच्या मेहनतीने त्याला आज शाहरुख खानसोबत बसण्याची संधी मिळाली. तुम्ही तुमच्या घरात बसून एटलीवर टीका करुन काय मिळवले”.

यावेळी ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला म्हणाले, “शाहरुख खान आणि एटली एकत्र येण्याची शक्यता आहे. एटली एक चित्रपट तयार करत आहेत. मर्सलचा हिंदी रीमेक किंवा एक नवीन स्क्रिप्ट चित्रपट असू शकतो”.

शाहरुख खानचा येणार नवीन चित्रपट डॉन 3 असणार आहे. फरहान अख्तर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत, अशी चर्चा सध्या सुरु आहे. शाहरुखचा झिरो चित्रपटातून आता समोर आले होते. मात्र त्यानंतर शाहरुखचा एकही नवीन चित्रपट अजून प्रदर्शित झाला नाही. या चित्रपटात शाहरुखसोबत अभिनेत्री कॅटरीना कैफ होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI