‘या’ कारणामुळे कुशल पंजाबीची आत्महत्या, सुसाईड नोटमधून उलगडा

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता कुशल पंजाबी याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (TV Actor Kushal Punjabi Suicide note)  केली आहे.

'या' कारणामुळे कुशल पंजाबीची आत्महत्या, सुसाईड नोटमधून उलगडा

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेता कुशल पंजाबी याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (TV Actor Kushal Punjabi Suicide note)  केली आहे. कुशल पंजाबीचे वय अवघे 37 वर्षे होतो. त्याच्या या टोकाच्या पावलामुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. वांद्र्यातील पाली हिल परिसरात कुशलचा मृतदेह सापडला. यासोबत पोलिसांना सुसाईट नोटही सापडली (TV Actor Kushal Punjabi Suicide note)  आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुशलचे आईवडील काल रात्रीपासून त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्याचा काहीही संपर्क झाला नाही. त्यानंतर त्याचे आईवडील काल (26 डिसेंबर) रात्री 11.30 च्या सुमारास वांद्र्यातील राहत्या घरी आले. त्याच्या आईवडीलांनी घराची दरवाजा ठोठावला. मात्र बराच वेळ दरवाजा कोणीही न उघडल्याने त्यांनी एका चावीवाल्याला बोलवलं आणि दरवाजा उघडला. दरवाज उघडताच कुशल फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळला.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता कुशाल पंजाबीची आत्महत्या

कुशलचा मृतदेह 26 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजून 10 मिनिटांनी आढळला. सध्या याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. कुशलने आत्महत्येपूर्वी इंग्रजीमध्ये दीड पानांची सुसाईट नोट लिहिली (TV Actor Kushal Punjabi Suicide) आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुशल पंजाबीच्या घरी मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी प्रॉपर्टीबाबत महत्त्वाचे मुद्दे मांडले आहे. माझ्या प्रापर्टीचा अर्धा हिस्सा माझे भाऊ, बहीण, आई, वडील यांना देण्यात यावा. तर अर्धा हिस्सा हा माझ्या बायको आणि मुलाला देण्यात यावा असे कुशलने या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

“मला चित्रपटसृष्टीत न मिळणारी ऑफर, माझे चित्रपट बॉक्स ऑफिसवर न चालणे या कारणामुळे मी आत्महत्या करत आहे,” असे कुशलने यात लिहिले आहे. कुशल गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता.

कुशलने एका युरोपियन तरुणीशी लग्न केलं होतं. त्याला एक मुलगाही आहे. त्याच्या मुलाचा जन्म 2016 मध्ये झाला होता. काही कारणात्सव त्याची पत्नी आणि मुलगा त्याच्यापासून विभक्त राहत होते. ज्यामुळे तो फार तणावामध्ये होता. कुशलने त्याच्या पत्नीसोबत घटस्फोटासाठीही प्रयत्न केले होते. मात्र कोणीही त्यांचा घटस्फोट याचिका दाखल झाली (TV Actor Kushal Punjabi Suicide note)  नाही.

Published On - 4:27 pm, Fri, 27 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI