जगात काय घडतंय? : टांझानियात बकरी आणि पॉपॉ फळ कोरोना पॉझिटिव्ह

| Updated on: May 05, 2020 | 12:13 AM

कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी जगातील अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. भारतातही कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

जगात काय घडतंय? : टांझानियात बकरी आणि पॉपॉ फळ कोरोना पॉझिटिव्ह
Follow us on

मुंबई :  जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे (World Corona News). कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी जगातील अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. भारतातही कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सध्या देशात 42,836 कोरोना रुग्ण आहेत. त्याशिवाय, आजपासून देशात लॉकडाऊनच्या तिसऱ्या भागाची सुरुवात झाली आहे. यादरम्यान, जगात अनेक मोठे बदल पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर जगभरात घडत असलेल्या घडामोडींचा एक आढावा (World Corona News)

1. टांझानिया देशात चक्क बकरी आणि एक फळ सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर खळबळ माजली. तिथल्या राष्ट्रपतींनी मात्र या गोष्टीला नकार देत चाचण्या करणाऱ्या उपकरणांचीच चाचणी घेण्याची गरज असल्याचं म्हटलं. टांझानियात बकरी आणि पॉपॉ नावाचं एक फळ कोरोना पॉझिटिव्ह निघालं. दरम्यान, एखादं फळ सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असू शकतं का, याच्या सखोल अभ्यासासाठी टांझानियातल्याा अजून इतर तज्ज्ञांचंही मत घेतलं जातं आहे. टांझानिया हा एक आफ्रिकन देश आहे. मात्र, याआधीपासून तिथले राष्ट्रपती कोरोनाग्रस्तांचा आकडा लपवत असल्याचा आरोप होतो आहे. 4 कोटी 37 लाख लोकसंख्येचा हा देश आहे आणि वर्ल्डोमीटर नुसार तिथे आतापर्यंत 480 लोक कोरोनाबाधित आहेत.

2. जगभरातून दबाव वाढत असल्याचं लक्षात आल्यानंतर चीननं आपल्या व्हायरलॉजी लॅबच्या वेबसाईटवरचे काही फोटो डिलीट केले आहेत. त्यामुळे चीनच्या भूमिकेबाबत अजून जास्त संशय बळावला आहे. जे फोटो डिलीट केले गेले आहेत, त्यात वुहान लॅबच्या शास्ज्ञत्रांना चीन सरकारकडून कोणतीही खबरदारीची उपकरणं दिली जात नसल्याचं स्पष्ट होतं. वघवाघुळांसारखे प्राणी पकडताना आणि ते हाताळताना शास्रज्ञांच्या चेहऱ्यावर कोणताही मास्क नाही. त्यामुळे चीन खरोखर वुहान लॅबच्या सुरक्षेसंदर्भात गंभीर होतं का? या प्रश्नाला अजून बळ मिळालं आहे. डेलीमेलनं ही बातमी
प्रसिद्ध केली.

3. अमेरिकेनं चीनबाबत अजून एक गंभीर आरोप केला आहे. आवश्यक वस्तूंची साठेबाजी करण्यासाठीच चीननं जगाला कोरोनाची लवकर माहिती दिली नसल्याचा आरोप अमेरिकनं केला. धक्कादायक म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यात चीननं मोठ्या प्रमाणात इतर देशांकडून आयात करुन निर्यात घटवली होती. त्याचाच अर्थ चीनला कोरोनाची गंभीरता कळाली होती. मात्र, अत्यावश्यक गोष्टी इतर देशांपासून खरेदी करता याव्यात, म्हणून चीननं कोरोना लपवून ठेवल्याचा आरोप अमेरिकेनं केला.

4. काश्मीरच्या डल लेकमधून थेट पीर पंजालचा पर्वत दिसू लागला आहे. लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणात घट आणि हवा स्वच्छ झाल्याने ही अद्भूत गोष्ट घडली. पीर पंजाल ही हिमालयातलीच एक पर्वतरांग आहे. गुगल मॅपनुसार श्रीनगरच्या डेल लेकपासून पीर पंजाल रेंजचं अंतर 198 किलोमीटर आहे. मात्र, हवाई अंतर मोजल्यास ते 198 किलोमीटरपेक्षा कमी आहे. वाढत्या प्रदूषणामुळेच श्रीनगरमधून अनेक पर्वत दिसणे बंद झालं होतं. मात्र, आता अनेक गोष्टी डोळ्यानं स्पष्ट (World Corona News) दिसत आहेत.

5. पाकिस्तानच्या वायु दलात इतिहासात पहिल्यांदाच एका हिंदू व्यक्तीची पायलट म्हणून निवड झाली. राहुल देव असं तरुणाचं नाव आहे. पाकिस्‍तान वायुदलात जनरल ड्यूटी पायलट ऑफिसर म्हणून त्याची नियुक्ती झाली आहे. पाकिस्तानातून अनेकदा अल्पसंख्याक समाजावर अत्याचाराच्या बातम्या येतात. त्यात ही बातमी सकारात्मक मानली जात आहे. राहुल देव हा तरुण थारपारकर भागात राहणारा आहे. थारपरकर हा भाग पाकिस्तानातल्या सिंध प्रांतात येतो. थारपरकर जिल्ह्यात मोठ्या संख्येनं हिंदू लोक आहेत.

6. चीननं आता अँटीकोरोना कार बनवण्याच्या मागे लागला आहे. तिथल्या काही मोटार कंपन्यांनी अँटीकोरोना कारची निर्मिती सुद्धा सुरु केली. कंपन्यांच्या दाव्यानुसार, कारची बनावटच अशी असेल, की ज्यात कोणताही बॅक्टेरिया, व्हायरस टिकणार नाही. कारमध्येच एक फिल्ट्रेशन सिस्टिम बसवण्यात आल्यामुळे कारमध्ये कोणत्याही विषाणूचं संक्रमण होत नाही. एका कंपनीच्या दाव्यानुसार निर्मितीआधीच 30 हजार कारची बुकिंग झाली आहे. मात्र, काही तज्ज्ञांनी वाहन कंपन्याचा दावा फेटाळून लावला आहे. कंपन्या कोरोनाचा फायदा घेऊन स्वतःचा नफा वाढवत असल्याचा आरोपही
त्यांच्यावर होतो आहे.

7. कोरोनाचा फैलाव भारतातही आता रोज नवनवे रेकॉर्ड करु लागला आहे. शनिवारच्या 24 तासात भारतात आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण सापडले होते. शनिवारी संपूर्ण देशात 2,442 लोक कोरोनाबाधित निघाले. मात्र, रविवारनं नवा विक्रम केला. रविवारी 24 तासात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 2,806 इतका झाला. हा 24 तासातला आतापर्यंतचा भारतातला सर्वाधिक आकडा आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे फक्त मागच्या तीनच दिवसात भारतात सव्वा सात हजारच्या आसपास रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्राचा विचार केला, तर शुक्रवारच्या तुलनेत मात्र शनिवार आणि रविवारी
महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत.

8. न्यूझीलंडमध्ये मागच्या 24 तासात एकही कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही. मागच्या 7 आठवड्यानंतर न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण न सापडण्याची ही पहिली घटना आहे. भारताप्रमाणेच न्यूझीलंडमध्येही 25 मार्चला लॉकडाऊन जाहीर झालं होतं. याआधी 16 मार्चला न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नव्हता. त्यानंतर थेट 3 मे रोजी0 कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. सध्या न्यूझीलंडमध्ये 1,487 कोरोनाचे रुग्ण आहेत आणि लॉकडाऊनमधून अंशता सूट देण्यात आली आहे.

9. बेल्जियमच्या कायदेमंत्र्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात खुद्द मंत्र्यांनाच मास्क न घालता आल्यामुळे त्यांची फजिती झाली. कोरोनापासून सतर्क राहण्यासाठी त्यांनी मास्क घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, मास्क घालता-घालता मंत्र्यांचेच मोठे हाल झाले. दरम्यान, हा व्हिडीओ तिथल्या सोशल माध्यमांवर व्हायरल झाला. सध्या बेल्जियममध्ये 49 हजार लोक कोरोनाबाधित आहेत.

10. कोरोनाच्या फैलावानंतर बिजिंगमध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात लोक फिरण्यासाठी बाहेर पडले आहेत. मे महिन्याच्या सलग तिसऱ्या दिवशी रस्ते आणि बगिच्यांमध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. माहितीनुसार, मागच्या 3 दिवसात चीनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 8 कोटींच्या आसपास लोक घराबाहेर पडले होते. कोरोनाच्या 3 महिन्याच्या थैमानानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं (World Corona News) लोक रस्त्यांवर आलेले पाहायला मिळाले.