Kim Jong Un | किम जोंग उनची दणक्यात एण्ट्री, खत कारखान्याची फित कापून जगाला दर्शन

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनने सर्व (Kim Jong Un Appears at a Factory Opening) अफवा फेटाळून लावत झोकात एण्ट्री केली.

Kim Jong Un | किम जोंग उनची दणक्यात एण्ट्री, खत कारखान्याची फित कापून जगाला दर्शन

प्योंग्यांग (Pyongyang ): उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनने सर्व (Kim Jong Un Appears at a Factory Opening) अफवा फेटाळून लावत झोकात एण्ट्री केली. जवळपास तीन आठवडे गायब असलेल्या किम जोंग उनने सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी किमचं जंगी स्वागत करण्यात आलं. किम जोंग उन तीन आठवडे सार्वजनिक कार्यक्रमात दिसला नव्हता. त्यामुळे त्याच्या प्रकृतीवरुन अनेक उलटसुटल चर्चा सुरु होती. इतकंच नाही तर अमेरिकन माध्यमांनी त्याच्या निधनाचेही वृत्त प्रसिद्ध केलं होतं. (Kim Jong Un Appears at a Factory Opening)

या सर्व पार्श्वभूमीवर किम जोंगने आज एका खताच्या कारखानाच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली. उत्तर कोरियाची सरकारी न्यूज एजन्सी केसीएनएने याबाबतचं वृत्त दिलं.

12 एप्रिललानंतर दर्शनच नाही

किम जोंग उन यापूर्वी 12 एप्रिललाला सार्वजनिक कार्यक्रमात दिसला होता. त्यानंतर तो दिसलाच नव्हता. त्यानंतर किमवर 12 एप्रिल रोजीच हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी शस्त्रक्रिया झाल्याचे वृत्त उत्तर कोरियातील बातम्या पुरवणाऱ्या दक्षिण कोरियामधील ‘डेली एनके’ या ऑनलाइन वृत्तपत्राने दिले होते.

उत्तर कोरियाचे पितामह किम द्वितीय सुंग यांची जयंती असल्याने 15 एप्रिल हा देशातील सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. मात्र, जयंती उत्सवाला किम जोंग उन गैरहजर होता. त्याच्याविषयी कोणतीही अधिकृत माहिती न आल्याने आश्चर्य व्यक्त केलं गेलं. यामुळेच किमच्या आरोग्याबद्दल उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली होती.

किमला पुन्हा पाहून जनतेमध्ये उत्साह
किमने खत कंपनीचं उद्धाटन करुन उपस्थित जनतेला हात दाखवून अभिवादन केलं. यावेळी नागरिकांनी जल्लोषात स्वागत केलं. टाळ्या वाजवून, झेंडे फडकावून लोकांनी किम जोंगचं स्वागत केलं.

संबंधित बातम्या 

उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उनची प्रकृती चिंताजनक, अमेरिकन वृत्तपत्रांचा दावा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *