पावसाळ्यात फॅशनसोबतच कंफर्टही महत्त्वाचा, पावसाळी शूज व सँडल खरेदी करताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

ज्याप्रमाणे पावसाळा लक्षात घेऊन कपडे निवडले जातात, त्याचप्रमाणे सँडल, चप्पल आणि शूज खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. चला तर मग जाणून घेऊयात पावसाळी सँडल खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात...

पावसाळ्यात फॅशनसोबतच कंफर्टही महत्त्वाचा, पावसाळी शूज व सँडल खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी
Rainy Shoes
| Edited By: | Updated on: Jul 21, 2025 | 4:21 PM

फॅशनच्या दृष्टिकोनातून पावसाळा थोडा आव्हानात्मक असतो, कारण या दिवसांमध्ये तुम्ही असे कपडे परिधान करायला पाहिजे, जे स्टायलिश दिसण्यासोबत तुम्हाला कंफर्टेबल लूकही देईल, विशेषतः फुटवेअरच्या बाबतीत अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. या दिवसांमध्ये तुमचे फुटवेअर पाण्यातून जाताना केवळ ट्रेंडी दिसले नाही पाहिजेत तर ते पावसाच्या पाण्यामुळे होणाऱ्या संसर्गापासून पायांचे संरक्षण करणारे असावे.

आजकाल बाजारात केवळ स्टाइलच्या बाबतीतच नाही तर प्रत्येक ऋतूमध्ये आरामाच्या बाबतीतही अनेक पर्याय उपलब्ध आहेत, खरेदी करताना तुम्हाला फक्त छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. यानंतर पावसाळ्याच्या दिवसात स्टाइल आणि कंफर्ट लूक दोन्ही आरामात सांभाळता येतात. तर आजच्य या लेखात आम्ही अशा काही टिप्सबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला पावसाळ्यातील परिपूर्ण फुटवेअर खरेदी करण्यास मदत करतील.

फुटवेअर ही केवळ गरज नाही तर ती तुमची फॅशन चॉईज देखील दाखवते आणि स्टाइल स्टेटमेंटसाठी देखील ते महत्त्वाचे आहे. मुलींसाठी पावसाळ्यात सँडल खरेदी करणे आणखी आव्हानात्मक बनते. चला तर मग पाहूयात पावसाळ्यात तुम्ही कोणत्या प्रकारचे फुटवेअर निवडावेत.

वॉटरप्रूफ, स्लिप-रेजिस्टेंट

ऋतूनुसार बाजारात अनेक प्रकारचे फुटवेअर उपलब्ध असतात. पावसाळ्यात अनेक लोकंही फुटवेअरच्या रंगाची निघून जाणार नाही ना याची चिंता असते. पण पावसाळ्यात सँडेल खरेदी करताना फुटवेअर वॉटरप्रूफ असावेत. याशिवाय फुटवेअर स्लिप-रेजिस्टेंट असणे महत्वाचे आहे. तर या गोष्टी लक्षात ठेऊन फुटवेअर खरेदी करावेत, जेणेकरून तुम्ही ओल्या रस्त्यांवर आणि कोणतीही चिंता न करता आरामात चालू शकाल.

फुटवेअर कॉलीटी आणि मटेरियलची काळजी घ्या

पावसाळ्यात लेदर, कापड किंवा जड मटेरियलचे शूज खरेदी करू नयेत. तुम्हाला पावसाळ्यात अशा फुटवेअरने चालताना अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. कारण अशा मटेरियल असलेल्या सँडल ओलावा आणि उष्णता पायांच्या त्वचेलाही नुकसान पोहोचवू शकतात. या प्रकारचे फूटवेअर पाण्यात लवकर खराब होतात. रबर, पीव्हीसी किंवा ईव्हीए सारख्या मटेरियलपासून बनवलेले स्लिप-ऑन आणि फ्लॅट्स असे फुटवेअर खरेदी करणे सर्वोत्तम पर्याय आहेत. तुम्ही तुमच्या मान्सून फूटवेअर कलेक्शनमध्ये क्रॉक्स आणि स्टायलिश रेन बूट समाविष्ट करू शकता.

व्हेंटिलेशनची काळजी घ्या

पावसाळ्यात, तुम्ही असे फुटवेअर निवडावेत ज्यात पाणी अजिबात आत जाऊ देत नाही किंवा चांगले व्हेंटिलेशन होत राहील याची काळजी घ्या, यामुळे तुमची त्वचा कोरडी राहते आणि बुरशीजन्य संसर्गाचा धोका कमी होतो त्यासोबतच पायाल दुर्गंधी येत नाही. फुटवेअर असे असावेत की ते लवकर सुकवेत.

फिटिंगची काळजी घ्या

पावसाळ्यात तुम्ही नेहमीच परिपूर्ण फिटिंग असलेले फुटवेअर घालावेत, कारण तुमचे आरोग्य देखील त्याच्याशी संबंधित आहे. विशेषतः पावसाळ्यात, तुमचे बूट, सँडल आणि फ्लॅट योग्य फिटिंगचे आहेत याची जास्त काळजी घ्या, अन्यथा ते ओले झाल्यावर तुमच्या पायाला खूप त्रास होऊ शकतो.

देखभाल करणे सोपे

पावसाळ्यात असे फुटवेअर निवडा जे चिखलात खराब झाल्यावर सहज स्वच्छ करता येतील आणि जे तुम्ही घरी धुवू शकता. म्हणूनच या ऋतूमध्ये, ऑनलाइन सेवांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतः बाजारात जाऊन फुटवेअर खरेदी करणे चांगले.