‘हे’ 6 पेये जपानी मॅचा टीपेक्षा कितीतरी पटीने आहेत आरोग्यदायी, जेन-झेडनी एकदा तरी करा ट्राय
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण त्यांचा आरोग्याची काळजी घेऊ शकत नाहीत. यासाठी लोकं त्यांच्या आहारात आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करत असतात. अशातच काही भारतीय पेये आहेत जी माचा टी इतकीच फायदेशीर आहेत. चला तर मग या पेयांबद्दल जाणून घेऊयात...

रोजच्या धावपळीत आपण अनेकदा आरोग्याची नीट काळजी घेत नाही. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत असतात. यासाठी बहुतेकजण त्यांच्या आहारात निरोगी पदार्थांचे सेवन करत असतात. तर काही लोकं विशेष नैसर्गिक पेयांचे सेवन करत असतात. ज्यामुळे शरीराला खूप फायदे मिळतात. आजकाल सोशल मीडियावर अनेक प्रकारचे नैसर्गिक पेये व्हायरल होत आहेत. यामध्ये बबल टी, आइस्ड कॉफी, बोबा टी आणि माचा टी यांचा समावेश आहे.
माचा टीबद्दल बोलायचे झाले तर, सेलिब्रिटींनीही या टीचे त्यांच्या आहारामध्ये समावेश केला आहे. तर या माचा टी पेयाचा ट्रेंड जपानमधून आला असून जेन-झेडला हे टी जास्त आवडते. पण तुम्हाला माहिती आहे का की काही माचा टीपेक्षा ही काही भारतीय पेये आरोग्यासाठी उत्तम आहेत. हे पेये अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात, चयापचय वाढवतात आणि मन शांत ठेवतात. तर आजच्या या लेखात आरोग्यदायी पेयांबद्दल जाणून घेऊयात.
लिंबू पाणी
उन्हाळ्यात उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी लिंबूपाणी हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग मानला जातो. ताज्या लिंबाचा रस, मीठ, साखर आणि कधीकधी चाट मसाला मिक्स करून लिंबू पाणी बनवले जाते. तुम्ही लिंबू पाणी प्यायले तर ते तुमचे शरीर हायड्रेट ठेवते आणि तुम्हाला त्वरित ताजेपणा देते. त्यात पुदिना किंवा सोडा घालून तुम्ही लिंबू पाणी आणखी चविष्ट बनवू शकता.
मसाला ताक
ताकाचे सेवन तुमचे पचन सुधारते . दह्यात पाणी मिक्स करून त्यात आले, भाजलेले जिरे, कोथिंबीर आणि मीठ टाकून ते बनवले जाते. त्यात असलेले प्रोबायोटिक्स ते माचा आणि कोंबुचापेक्षा आरोग्यदायी बनवतात. तुम्ही ते दररोज पिऊ शकता.
रोज मिल्क
रोज मिल्क केवळ दिसायलाच सुंदर नाही तर ते आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. हे थंड दूध आणि गुलाबाच्या सरबतापासून बनवले जाते. तर या पेयाची चव गोड असल्याने लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. त्यात चिया बियाणे टाकून ते अधिक आरोग्यदायी बनवून सेवन करू शकता.
फिल्टर कॉफी
दक्षिण भारतातील फिल्टर कॉफी हे फक्त एक पेय नाही तर तिथल्या संस्कृतीचा एक भाग आहे. स्टीलच्या फिल्टरमध्ये बनवलेली स्ट्रॉंग कॉफी पितळी भांड्यात गरम दूध आणि साखर टाकून दिली जाते. तिचा सुगंध आणि फेस त्याला कोणत्याही महागड्या कॅपुचिनोपेक्षा जास्त आरामदायी बनवतो.
सत्तू पेय
सत्तू पेय हे बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये खूप लोकप्रिय आहे. तर हे सत्तू पेय अनेक प्रकारे आहारात समाविष्ट केले जाते. सत्तू हे एक आरोग्यदायी पेय आहे. जर तुम्ही उन्हाळ्यात ते प्यायले तर ते अनेक आरोग्यदायी फायदे देखील देते. ते पोटासाठी वरदानापेक्षा कमी नाही.
जलाजिरा
आंबट आणि मसालेदार जलजिरा चवीला अप्रतिम आहे. ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. चिंचेचे पाणी, पुदिना, काळे मीठ, भाजलेले जिरे टाकून पेय बनवले जाते. ते पचन सुधारते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
