AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरातच बनवा हे 4 चविष्ट लोणचे, जो कोणी खाईल तो बोटं चाटत राहील

जेवणात लोणचे असेल तर जेवणाची चव अधिक वाढते. बाजारातून विकत घेण्यापेक्षा, घरच्या घरी लोणचे बनवल्यास चव आणि आरोग्य दोन्ही चांगले राहते. चला, असे 4 सोपे लोणचे कसे बनवायचे ते जाणून घेऊया.

घरातच बनवा हे 4 चविष्ट लोणचे, जो कोणी खाईल तो बोटं चाटत राहील
Image Credit source: TV9 Network/File
| Edited By: | Updated on: Aug 09, 2025 | 4:05 PM
Share

जेवणामध्ये लोणचं (अचार) असेल तर जेवणाची चव आणखी वाढते. बाजारातून लोणचं विकत घेण्यापेक्षा, जर ते घरी बनवले तर चव आणि आरोग्य दोन्ही चांगले राहतात. आज आम्ही तुम्हाला अशा 4 सोप्या लोणच्यांच्या रेसिपी सांगणार आहोत, जे तुम्ही घरच्या घरी सहज बनवू शकता आणि जे खूप चविष्ट लागतील.

चला, या रेसिपीज कशा बनवायच्या ते जाणून घेऊया.

1. मुळ्याचे लोणचं

मुळ्याचे लोणच खायला कुरकुरीत आणि तिखट असते, जे जेवणाची चव दुप्पट करते.

साहित्य:

  • मुळा (पातळ तुकडे केलेले)
  • मीठ, हळद, लाल तिखट
  • मोहरीचे तेल

कृती:

  • मुळ्याचे पातळ तुकडे करून घ्या.
  • त्यात मीठ, हळद, लाल तिखट आणि मोहरीचे तेल टाकून सर्व एकत्र करा.
  • मसाले प्रत्येक तुकड्याला व्यवस्थित लागतील याची खात्री करा.
  • हे मिश्रण 2 -3 दिवस उन्हात ठेवा. लोणचे तयार झाल्यावर याचा कुरकुरीतपणा आणि तिखट चव तुम्हाला खूप आवडेल.

2. आवळ्यााचे लोणच

आवळ्यााचे लोणच फक्त चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. यात व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारशक्ती (immunity) वाढवण्यास मदत करते.

साहित्य:

  • आवळा (उकडलेले आणि तुकडे केलेले)
  • मीठ, हळद, लाल तिखट
  • मोहरीचे तेल

कृती:

  • आवळे आधी उकळून त्याचे छोटे तुकडे करा.
  • यात मीठ, हळद, लाल तिखट आणि मोहरीचे तेल घालून चांगले मिसळा.
  • हे मिश्रण 3 – 4 दिवस उन्हात ठेवा.

3. गाजराचे लोणचं

गाजराचे लोणच हिवाळ्यात खाण्यासाठी एकदम बेस्ट आहे. याची चव आंबट-तिखट आणि मसालेदार असते.

साहित्य:

  • गाजर (लांब तुकडे केलेले)
  • मीठ, लाल तिखट, ओवा (अजवाइन)
  • मोहरीचे तेल

कृती:

  • गाजराचे लांब तुकडे करून त्यात मीठ, लाल तिखट, ओवा आणि मोहरीचे तेल घाला.
  • सर्व व्यवस्थित एकत्र करा.
  • हे मिश्रण 3 -4 दिवस उन्हात ठेवा. हिवाळ्यात याचा चटपटीत आणि हलका तिखट स्वाद खूप छान लागतो.

4. कांद्याचे लोणचे

कांद्याचे लोणचे हे लोणचे सर्वात कमी वेळात तयार होते आणि जेवणाची चव वाढवते.

साहित्य:

  • छोटे कांदे (सोललेले)
  • मीठ, लाल तिखट, व्हिनेगर (सिरका)
  • मोहरीचे तेल

कृती:

  • छोटे कांदे सोलून एका भांड्यात घ्या.
  • त्यात मीठ, लाल तिखट आणि थोडे व्हिनेगर घाला.
  • वरून मोहरीचे तेल टाकून सर्व एकत्र मिसळा.
  • हे लोणचे फक्त एका दिवसात तयार होते. चपाती किंवा पराठ्यासोबत हे खूप चविष्ट लागते.

या सोप्या रेसिपीज वापरून तुम्ही तुमच्या जेवणाला एक नवा ट्विस्ट देऊ शकता आणि घरगुती लोणच्याचा आनंद घेऊ शकता.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.