Fitness Secrets : अभिनेत्री मृणाल ठाकूरकडून फिटनेसचं रहस्य समोर, ‘या’ दोन गोष्टींना जास्त प्राधान्य

या लॉकडाऊनमध्ये अनेकांनी व्यायामाला प्राधान्य दिलं, तुमचे लाडके कलाकारसुद्धा यापेक्षा वेगळे नाहीत.मृणाल लॉकडाऊनमध्ये फार फिटनेस फ्रीक झाली आहे. (Actress Mrunal Thakur reveals the secret of fitness)

Fitness Secrets : अभिनेत्री मृणाल ठाकूरकडून फिटनेसचं रहस्य समोर, 'या' दोन गोष्टींना जास्त प्राधान्य

मुंबई : लॉकडाऊनमुळे अनेक लोकांच्या विचारांमध्ये आणि लाइफस्टाईलमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. या लॉकडाऊनमध्ये अनेकांनी व्यायामाला प्राधान्य दिलं, तुमचे लाडके कलाकारसुद्धा यापेक्षा वेगळे नाहीत. जॉन अब्राहम, ऋतिक रोशन, शाहिद कपूर आणि फरहान अख्तर या कलाकारांसोबत काम केलेली अभिनेत्री मृणाल ठाकूरनंसुद्धा या लॉकडाऊनमध्ये आपल्या हेल्थकडे विशेष लक्ष दिलं आहे.

मृणाल लॉकडाऊनमध्ये फार फिटनेस फ्रीक झाली आहे. तिच्या फिटनेसमुळे आता तिच्या लूक्समध्येसुद्धा मोठा बदल जाणून येतोय. तिचे हे फोटोबघून तुम्हाला अंदाजा येईल की तिनं स्वत:च्या फिटनेसवर किती लक्ष केंद्रित केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mrunal Thakur (@mrunalofficial2016)

फिटनेस बाबतीत मृणालचं मत ..

फिटनेस बाबतीत मृणाल सांगते, ‘फिटनेस माझ्यासाठी कायम महत्वाचं आहे. मी खूप आधीच व्यायाम सुरू केला होता, मात्र बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर मला त्याचं महत्व जास्त कळलं. मला को-अॅक्टर्सनं नेहमीच फिटनेसचं महत्व सांगितलं. फिट राहिल्यास आपण आपल्या समस्यांविरुद्ध लढू शकतो असा मला विश्वास आहे. मात्र फिटनेस हे एका रात्री मिळवण्यासारखी गोष्ट नाही, त्यासाठी तुम्हाला कायम मेहनत घ्यावी लागणार आहे. कोरोनामुळे हे आता लक्षात आलं आहे की आपल्याला शारिरीकरित्या तंदुरुस्त होणं जास्त महत्वाचं आहे.मला नेहमीच संतुलित आहार घेऊन फिट राहण्याची इच्छा आहे.मला स्पलिमेंटवर जराही विश्वास नाही, त्यापेक्षा माझा योगावर जास्त विश्वास आहे त्यामुळे मी नेहमीच योगासाठी वेळ काढत असते. या लॉकडाऊनमध्ये मी माझं आयुष्य योग्य पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं मी उत्तम काम केलं आहे. ‘