AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केस धुताना शॅम्पूमध्ये मिक्स करा ‘ही’ गोष्ट, हेअर फॉल होईल कमी

केस गळतीने त्रस्त आहात? हेअर फॉल कमी करण्यासाठी ही रेमेडी उपयुक्त ठरू शकते. शॅम्पूमध्ये हे एक मिश्रण मिक्स करून वापरल्याने फक्त केस गळती थांबणार नाही तर केसांचे आरोग्य देखील सुधारेल. हेअर ग्रोथसाठी सुद्धा हे फायदेशीर आहे.

केस धुताना शॅम्पूमध्ये मिक्स करा ‘ही’ गोष्ट, हेअर फॉल होईल कमी
hair fall
| Edited By: | Updated on: Sep 22, 2026 | 8:42 PM
Share

प्रत्येकाला लांब आणि दाट केस आवडतात. केस गळू नये, त्यांची योग्य वाढ व्हावी, ते दाट असावे यासाठी मुली बऱ्याच गोष्टी करत असतात. वेगवेगळे शॅम्पू, हेअर प्रोडक्ट वापरण्यासोबतच काही घरगुती उपायही केले जातात. तुम्ही सुद्धा केसांसाठी प्रभावी रेमेडी शोधत असाल तर हे एकदा ट्राय करून बघा. नेहमी वापरत असलेल्या शॅम्पूमध्ये हे एक मिश्रण घाला आणि याने केस धुवा. याने केवळ केस गळती कमी होणार नाही तर केसांची वाढ देखील दुपटीने होईल. केसांच्या पूर्ण आरोग्यासाठी, विविध समस्यांसाठी हे खूप प्रभावी उपाय ठरू शकते.

शॅम्पूमध्ये मिक्स करा हे मिश्रण जर तुमचे केस खूप गळत असतील, तुम्हाला लांब, दाट केस हवे असतील किंवा तुम्हाला तुमच्या केसांचे आरोग्य सुधारायचे असेल, तर तुमच्या नेहमीच्या शॅम्पूमध्ये या तीन घटकांचे मिश्रण मिक्स करा. चहापत्ती, तांदूळ आणि मेथीचे दाणे यापासून एक द्रावण तयार करा. हे मिश्रण तुमच्या शॅम्पूमध्ये मिक्स करा आणि केस स्वच्छ धुवा.

असे बनवा मिश्रण एका पॅन किंवा कढईत चहापत्ती, तांदूळ आणि मेथीचे दाणे घ्या. हे सर्व तुम्हाला प्रत्येकी एक चमचा घ्यायचे आहे. आता यात दोन ग्लास पाणी टाका. आता हे मिश्रण मध्यम आचेवर उकळा. साधारण १० मिनिट हे चांगले उकळू द्या.

वापरण्याची योग्य पद्धत हे मिश्रण उकळल्यानंतर थंड होऊ द्या. नंतर गाळून घ्या. आता तुम्ही वापरत असलेला कोणताही शॅम्पू या मिश्रणात मिक्स करा आणि याने केस धुवा.

किती दिवस साठवू शकता? हे मिश्रण तुम्ही एकदा बनवून साधारण ३ ते ५ दिवस वापरू शकता. रूम टेम्परेचर मध्ये हे लवकर खराब होते, त्यामुळे हे फ्रिजमध्ये ठेवावे. तसं तर प्रत्येक वेळी हे ताजे तयार करणे उत्तम ठरेल.

मिळतात हे फायदे – मेथी दाण्यांमध्ये असे घटक असतात जे केसांना सॉफ्ट बनवण्यास, टाळूतील ओलावा टिकवून ठेवण्यास आणि केसांच्या वाढीस चालना देण्यास मदत करतात. – चहापत्तीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे स्काल्प निरोगी ठेवण्यास आणि केसांना नैसर्गिकरित्या चमकदार बनविण्यात मदत करू शकतात. – तांदळाचे पाणी केस मऊ करण्यास आणि हेअर ग्रोथमध्ये मदत करते. – या मिश्रणाचा वापर केल्यामुळे केसांच्या विविध समस्या दूर होतात आणि केसांचे एकंदरीत आरोग्य सुधारते.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?