दारू की सिगारेट… कोणते व्यसन सोडणे सर्वात कठीण आणि का?

धूम्रपान किंवा मद्यपान आरोग्यासाठी हानिकारक आहे हे सर्वांनाच माहिती आहे पण ते आजच्या तरुणांच्या जीवनशैलीचा एक भाग बनले आहेत. ज्यामुळे दारू आणि सिगारेट यांचे व्यसन सोडणे सर्वात कठीण आहे, आणि का ते घ्या जाणून...

दारू की सिगारेट... कोणते व्यसन सोडणे सर्वात कठीण आणि का?
फाईल फोटो
| Updated on: Aug 03, 2025 | 1:40 PM

दारू आणि सिगारेट दोन्हीही आरोग्यासाठी हानिकारक आहेत. कधीकधी लोक मित्रांसोबत छंद म्हणून त्यांचे सेवन करायला लागतात आणि हा छंद कधी व्यसनात बदलतो हे त्यांना देखील कळत नाही. अखेर एकदा व्यसन लागले की, यापैकी कोणतेही व्यसन सोडणे खूप कठीण असते. दोन्ही व्यसनांनी समाजात खोलवर मुळे रोवली आहेत आणि त्यांचा केवळ आरोग्यावरच नाही तर सामाजिक आणि आर्थिक जीवनावरही परिणाम होतं… हे दृश्य आपण अनेक ठिकाणी पाहतो देखील. कोणते व्यसन सोडणे जास्त कठीण आहे ते जाणून घेऊया, दारू की सिगारेट?

एखाद्याला सिगारेटचे व्यसन का लागते?: तुम्ही सिगारेट ओढताच, काही सेकंदातच निकोटीन नावाचे रसायन तुमच्या मेंदूत पोहोचते. हे निकोटीन मेंदूत डोपामाइन नावाचे रसायन सोडते. हे डोपामाइन रसायन आपल्याला आनंदी आणि समाधानी करते. सिगारेट ओढल्यानंतर आपल्याला बरे वाटण्याचे हेच कारण आहे.

सिगारेटच्या व्यसनापासून मुक्त होणे खूप कठीण आहे, याचे कारण निकोटीनचे व्यसन आहे. निकोटीन मेंदूमध्ये डोपामाइन सोडते, ज्यामुळे व्यक्तीला काही काळ आनंद आणि आराम मिळतो. हेच कारण आहे की एखादी व्यक्ती सिगारेटचे व्यसन सोडू शकत नाही.

दारूचे व्यसन: दारूचे सेवन शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळीवर परिणाम करते. दारू मेंदूतील न्यूरोट्रांसमीटरवर परिणाम करते. ज्यामुळे व्यक्ती शांत किंवा उत्साहित होते. दारू अनेकदा सामाजिक मेळाव्यांचा भाग बनते, ज्यामुळे ते सोडणे कठीण होते.

व्यसनाधीन होण्यासाठी किती वेळ लागतो?: सिगारेटचे व्यसन लागण्यासाठी 6 महिने लागतात आणि 2- 3 वर्षांनी व्यसन सुरू होते. दारूचे व्यसन लागण्यासाठी थोडा वेळ लागतो, साधारणपणे दारूचे व्यसन लागण्यासाठी 1 ते 2 वर्षे लागतात परंतु जर एखाद्या व्यक्तीने 5 वर्षे सतत ते सेवन केले तर त्याला दारूचे व्यसन लागते जे नंतर सोडणे खूप कठीण होते.

कोणते व्यसन सर्वात धोकादायक आहे?: जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, निकोटीनचे व्यसन खूप लवकर विकसित होते आणि ते सोडणे तितकेच कठीण असते. सिगारेट ओढण्याची सवय दैनंदिन दिनचर्येचा एक भाग बनते. सकाळच्या चहासोबत कामाच्या विश्रांती दरम्यान किंवा तणावाच्या क्षणांमध्ये. सिगारेटचे व्यसन मानसिक आणि शारीरिक दोन्ही पातळ्यांवर काम करते.

निकोटीन मेंदूमध्ये डोपामाइन सोडते, ज्यामुळे व्यक्तीला तात्काळ आराम मिळतो. पण त्याचा परिणाम कमी होताच, व्यक्तीला पुन्हा सिगारेटची तल्लफ जाणवते. कधीकधी ते सोडण्यासाठी महिने किंवा वर्षे कठोर परिश्रम करावे लागतात. जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती या व्यसनावर मात करू इच्छिते तेव्हा ते सहजासहजी बाहेर पडत नाही.