AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Healthy Tips : सात दिवस, सात फळं… सफरचंदापासून किवीपर्यंत, कोणत्या दिवशी काय खाणं ठरेल आरोग्यदायी

Healthy Tips : डॉक्टर कायम फळं खाण्याचा सल्ला देतात. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, रोज वेगळी फळं खालं पाहिजे. तर जाणून घ्या आठवड्यातील सात दिवसांत कोणती सात फळं कोणत्या दिवशी खाल्ली पाहिजे...

Healthy Tips : सात दिवस, सात फळं... सफरचंदापासून किवीपर्यंत, कोणत्या दिवशी काय खाणं ठरेल आरोग्यदायी
| Updated on: Sep 07, 2026 | 3:54 PM
Share

Healthy Tips : आजची जीवनशैली पाहता, फळं खाण आरोग्यासाठी फार गरजेचं आहे. पण रोज एकच फळ खाणं आरोग्यासाठी योग्य नाही. आठवडाभर विविध प्रकारची फळं खाल्ल्याने शरीराला वेगवेगळी जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात. कोणतंही एक फळ तुमची प्रतिकारशक्ती दुप्पट करणार नाही. पण संतुलित आहाराचा भाग म्हणून विविध प्रकारची फळं खाल्ल्याने तुमच्या संपूर्ण आरोग्याला मदत होऊ शकते. म्हणून, आपलं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या दिवशी कोणती फळे खावीत आणि त्याचं वेळापत्रक काय असावं, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

सोमवारी सफरचंद आणि केळी खा… सफरचंदात फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, तर केळ्यांमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं. हे दोन्ही आरोग्यदायी नाश्त्यात किंवा दुपारच्या अल्पोपाहारात खाल्ले जाऊ शकतात.

मंगळवारी संत्र आणि पपई खा… संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. पपईमध्ये व्हिटॅमिन ए आणि पॅपेन नावाचे एन्झाइम यांसारखी अनेक पोषक तत्वे असतात. विविध प्रकारची फळे खाल्ल्याने तुम्हाला विविध प्रकारची पोषक तत्वे मिळू शकतात.

बुधवारी डाळिंब आणि नाशपाती खा… डाळिंबामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, तर नाशपातीमध्ये फायबर आणि व्हिटॅमिन सी असते. संतुलित आहाराचा भाग म्हणून यांचं सेवन केलं जाऊ शकतं.

गुरुवारी टरबूज आणि किवी खा… टरबूजामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, ज्यामुळे शरीराला हायड्रेट राहण्यास मदत होते. किवीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, फोलेट आणि पोटॅशियम यांसारखी अनेक पोषक तत्वे असतात.

शुक्रवार द्राक्षे आणि अननस खा… द्राक्षांमध्ये विविध अँटिऑक्सिडंट संयुगं असतात, तर अननसात ब्रोमेलेन नावाचं एन्झाइम असतं. त्यांचं सेवन प्रमाणात करणं उत्तम.

शनिवार आणि रविवारी ड्रॅगन फ्रूट, फणस, चिकू तुम्ही खाऊ शकता. ड्रॅगन फ्रूट आणि फणसामध्ये फायबरसह अनेक पोषक तत्वं असतात. चिकू आणि जर्दाळूमध्ये देखील विविध जीवनसत्त्वं आणि खनिजे आढळतात. पण, चिकू आणि फणसासारखी गोड फळं प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो. ही फळे उपलब्ध नसल्यास, पर्याय म्हणून इतर फळे खाल्ली जाऊ शकतात. पण आहारत काही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Follow Us
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक