AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केसांना आवळा लावताना या ३ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पडु शकते टक्कल

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात जे केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. केसांवर आवळा लावल्याने केसांना पोषण मिळते, ते मजबूत होतात आणि चमकदार बनतात. पण केसांवर आवळ्याचा वापर योग्य पद्धतीने केला नाही तर तुम्हाला केस गळण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागेल.

केसांना आवळा लावताना या ३ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पडु शकते टक्कल
| Edited By: Jitendra Zavar | Updated on: Mar 03, 2025 | 7:38 PM
Share

प्रत्येकाला आपले केस मजबुत आणि मऊ सिल्की असावे असे वाटते. यासाठी अनेकजण केसांची काळजी घेताना अनेक प्रकारच्या प्रॉडक्टचा वापर करत असतात. त्यातच काही लोक ही घरगुती उपायांचा वापर सर्वाधिक प्रमाणात करायला लागले आहेत. अशातच केसांच्या चांगल्या वाढीसाठी आवळ्याचा वापर करत असतात. आवळ्यापासून तयार करण्यात आलेले घरगूती प्रॉडक्ट केसांवर लावतो. कारण आवळा केसांसाठी उत्कृष्ट मानला जातो. व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त त्यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे केसांना मजबुत आणि निरोगी बनवण्यासाठी फायदेशीर असतात. आवळ्याचा नियमित वापर केसांना जाड, चमकदार बनवण्यास आणि केस गळती रोखण्यास मदत करतात. मात्र तुम्ही या गोष्‍टी देखील लक्षात घेतल्या पाहिजे की, जर ते योग्यरित्या केसांना लावले नाही तर तुमच्या केसांना नुकसान पोहोचू शकते. त्यामुळे केसांवर आवळ्याचा वापर करताना या चुका टाळा.

डोक्यात खाज सुटणे आणि जळजळ होणे

आवळ्यामध्ये ताजेपणा आणि थंडावा देणारे गुणधर्म आहेत. त्यामुळे तुम्ही जेव्हा केसांना आवळ्याचे प्रॉडक्ट लावता तेव्हा जास्त प्रमाणात वापर केल्यास काहींना टाळूमध्ये खाज सुटणे, जळजळ होणे किंवा सूज येऊ शकते. विशेषतः, जर तुमची टाळू संवेदनशील असेल तर आवळा जास्त वापरू नका. आवळा मर्यादित प्रमाणात वापरा.

अ‍ॅलर्जीचा धोका

काही लोकांना आवळ्याची अ‍ॅलर्जी असू शकते. आवळा केसांना वापरण्यापूर्वी तुम्हाला त्याची अ‍ॅलर्जी आहे की नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच आवळा वापरत असाल तर तुमच्या त्वचेवर थोड्या प्रमाणात आवळा लावून पॅच टेस्ट करा. त्यांनतरच आवळ्याचा वापर करा अन्यथा करू नये.

केसांचा रंग बदलणे

आवळ्यामध्ये असे गुणधर्म आहेत जे केसांचा रंग गडद करण्यास मदत करतात. जर तुमचे केस पांढरे असतील तर ते तुमचे केस काळे होऊ शकतात. पण जर तुम्ही आधीच तुमच्या केसांवर कोणताही बाजारात मिळणारे हेअर कलरचा वापर केला असेल तर आवळ्‌याच्या वापराने तुमच्या केसांचा रंग खराब करू शकतो.

आवळ्याचा योग्य वापर

  • आवळा मर्यादित प्रमाणात वापर करा. याचा जास्त वापर केल्याने टाळूला नुकसान होऊ शकते.
  • आवळा वापर केसांवर केल्यानंतर केस व डोके पूर्णपणे स्वच्छ धुणे महत्वाचे आहे.
  • आवळ्‌याचा थेट वापर केसांवर करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची ऍलर्जी किंवा इतर कोणतेही रिअॅक्शन टाळण्यासाठी तुमच्या स्कॅल्पवर थोडेसे लावून पॅच टेस्ट करा. त्यानंतर कोणतेही रिॲक्‍शन येत असेल तर आवळ्‌याचा वापर टाळा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...