AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही ‘सेक्सुअली ॲक्टीव’ आहात का? अशा प्रश्नांना मुळीच लाजू नका स्त्रीरोग तज्ञांनी विचारलेल्या प्रश्नांवर खोटं बोलणं तुम्हास पडू शकते भारी!

लैंगिक जीवनाशी संबंधित प्रश्न: भारतातील महिला-तरुणी अजूनही लैंगिक आरोग्यावर उघडपणे बोलण्यास कचरतात. अनेक वेळा महिलांनी याविषयी उघडपणे न बोलल्यास नंतर मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत स्त्रीरोग तज्ज्ञांच्या या प्रश्नांची तुम्ही न डगमगता उत्तरे देणे खूप गरजेचे आहे.

तुम्ही ‘सेक्सुअली ॲक्टीव’ आहात का? अशा प्रश्नांना मुळीच लाजू नका स्त्रीरोग तज्ञांनी विचारलेल्या प्रश्नांवर खोटं बोलणं तुम्हास पडू शकते भारी!
| Updated on: Aug 21, 2022 | 5:57 PM
Share

रिप्रोडक्टिव हेल्थ (Reproductive Health) राखण्यासाठी, प्रत्येक स्त्रीने स्त्रीरोगतज्ञांकडे जाऊन तिची नियमित तपासणी करणे महत्त्वाचे आहे. पण अशा अनेक महिला आहेत ज्या, आपल्या लैंगिक आरोग्याबद्दल (About sexual health) सांगण्यास टाळाटाळ करतात. जिव्हाळ्याच्या आरोग्याशी संबंधित समस्यांबद्दल स्त्रीरोगतज्ज्ञांशी उघडपणे न बोलणे काही वेळा तुमच्यासाठी खूप महागात पडू शकते. अशा स्थितीत स्त्रीरोग तज्ज्ञांनी विचारलेल्या प्रश्नांची तुम्ही कोणतीही लाज न बाळगता उत्तरे देणे गरजेचे आहे. तपासणी दरम्यान, स्त्रीरोगतज्ञ तुम्हाला तुमच्या खासगी आरोग्यासंबंधी विविध प्रश्न विचारू शकतात. आमच्या कडून त्या प्रश्नांबद्दल जाणून घ्या ज्यांची उत्तरे तुम्ही न घाबरता देणे फायदेशीर ठरेल. स्त्रीरोग तज्ज्ञांच्या (Gynecologists) काही प्रश्नांची तुम्ही स्पष्ट उत्तरे देणे खूप गरजेचे आहे. स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांच्या या 7 प्रश्नांची उत्तरे न देणे महिलांच्या वैय्यक्तीक आरोग्याला घातक ठरु शकते.

तुम्ही लैंगिकदृष्ट्या सक्रिय आहात का?

डॉक्टरांचा हा प्रश्न तुम्हाला मूर्खपणाचा वाटत असला तरी. पण, या प्रश्नाच्या उत्तराच्या आधारे डॉक्टर ठरवतात की, तुम्हाला कोणत्या चाचण्या करायच्या आहेत. स्त्रीरोग तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही डॉक्टरांशी शेअर केलेल्या माहितीनुसार तुमची काळजी घेतली जाते.नंतर गरज पडल्यास नेमके उपचार करण्यात येतात.

तुमचे किती लैंगिक भागीदार आहेत?

या प्रश्नाचे उत्तर देण्यास महिला अनेकदा संकोच करतात. जर तुम्ही गेल्या 15 वर्षांपासून एकाच जोडीदारासोबत राहत असाल, तर डॉक्टर तुम्हाला एसटीडी(STD) चाचणी न घेण्याचा सल्ला देऊ शकतात. पण जर तुम्ही एकाच महिन्यात तीन वेगवेगळ्या लोकांसोबत सेक्स केला असेल तर डॉक्टर तुम्हाला एसटीडी टेस्ट करायला सांगू शकतात.

तुमची मासिक पाळी दर महिन्याला वेळेवर येते का?

महिलांमध्ये नियमित मासिक पाळी चक्र 28 दिवसांचे असते. तारखेपासून तीन ते चार दिवसांनी मासिक पाळी येणे सामान्य आहे, परंतु जर हे अंतर जास्त असेल तर त्याला अनियमित मासिक पाळी म्हणतात. मासिक पाळी नियमित न येणे काही वेळा गंभीर असू शकते. असे झाल्यास, डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

सेक्स दरम्यान किंवा नंतर वेदना आणि रक्तस्राव?

सेक्स करताना किंवा नंतर कधी कधी तुमच्या योनी किंवा श्रोणीत वेदना होत असतील तर घाबरण्याची गरज नाही. तथापि, जर तुम्हाला सेक्स दरम्यान किंवा नंतर प्रत्येक वेळी वेदना होत असतील. तर तुम्ही डॉक्टरांना भेटावे. यासाठी, डॉक्टर तुम्हाला मूलभूत योनिमार्गाच्या संसर्गाची किंवा एंडोमेट्रिओसिसची चाचणी करवून घेण्यास सांगू शकतात.

तुमच्या योनीतून स्त्राव किंवा वासात काही बदल झाला आहे का?

अनेक स्त्रिया या प्रश्नाचे उत्तर देण्यास संकोच करतात. त्यामुळे अनेक वेळा डॉक्टरही महिलांना हे प्रश्न विचारत नाहीत. पण तुमच्या योनीतून स्त्राव, रंग, उग्रवास यात अचानक बदल होत असेल तर ते बॅक्टेरियाच्या संसर्गाचे लक्षण असू शकते. या समस्येचा सामना करणे खूप सोपे असले. तरी, यासाठी तुम्हाला डॉक्टरांना याबद्दल खुलेपणाने सांगावे लागेल.

तुम्ही तुमच्या फॅमेली प्लॅनिंग पद्धतीबद्दल आनंदी आहात का?

वैयक्तीक जीवनाबद्दल बोलताना डॉक्टर अनेकदा महिलांना हा प्रश्न विचारतात, परंतु जर तुमचे डॉक्टर हा प्रश्न विचारत नसतील, तर, तुम्ही इतर चांगल्या डॉक्टरांकडे जाणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला गर्भनिरोधकांच्या सुरक्षित पद्धती सांगणे आणि तुम्हाला मदत करणे हे स्त्रीरोगतज्ञाचे काम आहे. अशा परिस्थितीत गर्भनिरोधकांसाठी तुम्ही कोणत्या पद्धतींचा अवलंब करता? तुमच्या डॉक्टरांना याबद्दल सांगा जेणेकरून ते तुम्हाला सर्व पर्याय निवडण्यात मदत करू शकतील.

तुम्ही तुमचे स्तन स्वतः तपासता का?

प्रत्येक स्त्रीने स्वत:च्या स्तनाची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला तसे करण्याची आठवण करून देणे हे तुमच्या डॉक्टरांचे काम आहे. योग्य तपासणीसाठी डॉक्टर तुम्हाला आणखी बरेच प्रभावी मार्ग सांगू शकतात.

संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.