AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसी किती तापमानावर ठेवावा? जेणेकरून सर्दी-खोकला होणार नाही अन् वीज बिलही कमी येईल

एसीमुळे अनेकजण आजरी पडतात. शिवाय वीज बिलही जास्त येत. खूप थंड तापमानामुळे शरीराचे तापमान संतुलन बिघडते आणि सर्दी, खोकला होऊ शकतो. त्यामुळे एसीच नक्की तापमान किती ठेवावं ज्यामुळे आजारी पडणार नाही अन् वीज बिलही कमी येईल. जाणून घेऊयात.

एसी किती तापमानावर ठेवावा? जेणेकरून सर्दी-खोकला होणार नाही अन् वीज बिलही कमी येईल
At what temperature is it best to run AC? Cold and CoughImage Credit source: Meta AI
| Updated on: Jun 15, 2025 | 5:10 PM
Share

आता जवळपास सर्वांच्याच घरी एसी असतोच. कारण उन्हाळ्यात तर एअर कंडिशनरची थंड हवा वरदानापेक्षा कमी नसते. पण काहीवेळेला सतत एसीच्या हवेत राहिल्याने किंवा आवश्यकतेपेक्षा जास्त एसी थंड असल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो, सर्दी-खोकला होतो शिवाय वीज बिलही भरपूर प्रमाणात येतं. पण जर एसचं योग्य तापमन माहित असेल तर नक्कीच आपल्या या दोन्ही समस्या सुटू शकतात. पाहुयात याबाबत तज्ज्ञ काय म्हणतात ते.

खूप थंड तापमानाचा आरोग्यावर काय परिणाम होतो?

तज्ज्ञांच्या मते खूप कमी तापमानात एसी चालवल्याने शरीराच्या नैसर्गिक उष्णता संतुलन प्रणालीवर परिणाम होतो. जेव्हा आपण 18-19 अंशावर एसीचं तापमान असलेल्या खोलीतून बाहेर पडतो आणि थेट 40 ते 45 अंश तापमानाच्या उन्हात जातो तेव्हा शरीराच्या तापमानाचा धक्का बसतो. यामुळे थंडी, थकवा जाणवणे, सतत घाम येणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि अवयवांवर दबाव येणे किंवा वारंवार दुखणे असे आजार होऊ लागतात.

AC चं योग्य तापमान किती असावं?

एसीचं योग्य तापमान हे 22 ते 24 अंशांच्या दरम्यान चालवणे चांगले. हे तापमान केवळ आरामदायी नाही तर शरीरासाठी सुरक्षित देखील आहे. हा फरक इतका जास्त नसावा की शरीराला ते स्विकारणे कठीण होईल.

तापमानाचा अंदाज चुकला तर अस्वस्थ वाटू शकतं…

खोलीतील सूर्यप्रकाशानुसार थंडपणा हवा असण्याची गरज बदलू शकते. जर खोली थेट सूर्यप्रकाशात असेल तर थोडी जास्त थंडीची आवश्यकता असू शकते. कारण त्या खोलीत गरम तापमानही तेवढंच असणार. तर काही आरोग्य समस्या असलेल्या लोकांना खोलीत झोपल्याने श्वासोच्छवासावर आणि झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. एसीचे तापमान बाहेरील तापमानाच्या जितके जवळ असेल तितके ते चांगले राहील. यामुळे शरीराला थंड तापमानाचा त्रास होणार नाही शिवाय विजेचा वापर देखील कमी होईल.आणि परिणामी विजबीलही कमी येईल. अर्थात ते तुम्ही किती वेळ AC वापरता यावरही वीज बिल अवलंबून असतं.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.