AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गळ्यात रुद्राक्ष धारण करत असाल तर या चुका टाळा, अन्यथा होतील वाईट परिणाम

हिंदू धर्मात रुद्राक्ष धारण करण्याचे धार्मिक महत्त्व तर आहेच पण त्यामुळे लोकांचे आरोग्य ही चांगले राहते. असे मानले जाते की भगवान शंकराच्या अश्रूंपासून रुद्राक्ष तयार होतो त्यामुळे ते धारण करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

गळ्यात रुद्राक्ष धारण करत असाल तर या चुका टाळा, अन्यथा होतील वाईट परिणाम
| Edited By: | Updated on: Nov 24, 2024 | 9:28 PM
Share

हिंदू धर्मामध्ये रुद्राक्ष हे शिवाचे प्रतीक मानले जाते आणि ते धारण केल्याने व्यक्तीला अनेक फायदे होतात. परंतु रुद्राक्ष धारण करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. कारण देवाचे देव महादेव यांना रुद्राक्ष अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच रुद्राक्ष अंगावर घालतात. महादेवाचा आशीर्वाद घेण्यासाठी जो कोणी त्यांना रुद्राक्ष अर्पण करतो त्याला प्रत्येक कामात यश मिळते अशी मान्यता आहे. असे मानले जाते की रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीला रक्तदाब आणि हृदयविकाराशी संबंधित आजार सहजपणे होत नाहीत रुद्राक्ष वेगवेगळे आकाराचे असतात. रुद्राक्षांची शक्ती देखील वेगळी आहे. रुद्राक्ष अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जात असल्याने तो धारण करण्याचे काही खास नियम आहेत. त्याचे पालन न केल्यास त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात.

झोपताना रुद्राक्ष घालू नका

ज्योतिष शास्त्रानुसार झोपण्यापूर्वी रुद्राक्ष काढावा. असे मानले जाते की रुद्राक्ष धारण करून झोपल्यास ते अपवित्र होते. दुसऱ्या दृष्टिकोनातून बघितले तर झोपताना रुद्राक्ष तुटण्याची भीती असते म्हणून झोपण्यापूर्वी रुद्राक्ष काढण्याचा नियम आहे. सकाळी आंघोळ केल्यावरच रुद्राक्ष पुन्हा धारण करावा.

मांसाहार आणि मद्यपान करू नका

रुद्राक्ष अत्यंत पवित्र मानला जातो. त्यामुळे मास आणि मद्य सेवन करताना रुद्राक्ष धारण करू नये. असे मानले जाते की रुद्राक्ष हे भगवान शिवाला अर्पण आहे म्हणून त्याचे पावित्रभंग केल्यास व्यक्तीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात.

मूल जन्माला आल्यानंतर घालू नये

हिंदू धर्मात अशी धारणा आहे की नवजात बालकाच्या जन्मानंतर सुतक लावले जाते. त्यामुळे काही दिवस गोष्टी अशुद्ध राहतात. अशा परिस्थितीत मुलाच्या जन्मानंतर आई आणि मुलाने रुद्राक्ष धारण करणे टाळावे.

राशीनुसार करा रुद्राक्षाचे धारण

ज्योतिष शास्त्रानुसार सुख-समृद्धी आणि सौभाग्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी व्यक्तीने नेहमी राशीनुसार रुद्राक्ष धारण केले पाहिजे.

जाणून घेऊया बारा राशींसाठी कोणता रुद्राक्ष शुभ मानला जातो.

मेष – एक मुखी, तीन मुखी किंवा पाच मुखी रुद्राक्ष

वृषभ – चार मुखी, सहा मुखी किंवा चौदा मुखी रुद्राक्ष

मिथुन – चार मुखी, पाच मुखी, आणि तेरा मुखी रुद्राक्ष

कर्क – तीन मुखी, पाचमुखी किंवा गौरीशंकर रुद्राक्ष

सिंह – एक मुखी, तीन मुखी आणि पाच मुखी रुद्राक्ष

कन्या – चार मुखी, पाच मुखी आणि तेरा मुखी रुद्राक्ष

तूळ – चार मुखी, सहा मुखी किंवा चौदा मुखी रुद्राक्ष

वृश्चिक – तीन मुखी, पाचमुखी किंवा गौरीशंकर रुद्राक्ष

धनु – एक मुखी, तीन मुखी किंवा पाच मुखी रुद्राक्ष

मकर – चार मुखी, सहामुखी किंवा चौदा मुखी रुद्राक्ष

कुंभ – चार मुखी, सहा मुखी किंवा चौदा मुखी रुद्राक्ष

मीन – तीन मुखी, पाचमुखी किंवा गौरीशंकर रुद्राक्ष

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.