चुकूनही सिंकमध्ये टाकू नका स्वयंपाकघरातील या वस्तू, अन्यथा पाईपलाईन होईल ब्लॉक

स्वयंपाकघराचं स्वच्छ आणि व्यवस्थित असणं हे केवळ सौंदर्यासाठीच नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं आहे. मात्र, रोजच्या घाईगडबडीत सिंकमध्ये टाकलेल्या चुकीच्या वस्तूंपासून पाइपलाइन ब्लॉक होण्याचा धोका वाढतो

चुकूनही सिंकमध्ये टाकू नका स्वयंपाकघरातील या वस्तू, अन्यथा पाईपलाईन होईल ब्लॉक
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 25, 2025 | 9:14 PM

स्वच्छ स्वयंपाकघर म्हणजे आरोग्याचं दार. पण अनेकदा घाईत किंवा अनावधानाने आपण अशा गोष्टी सिंकमध्ये टाकतो, ज्या पाइपलाईन ब्लॉक होण्याचं मोठं कारण बनतात. विशेषतः चहा, कॉफीचे उरलेले घटक, अंड्यांचा बाहेरचा भाग, भात, भाजीपाल्याचे आवशेष किंवा तेल. या सगळ्यांमुळे पाइपमध्ये चिकटपणा तयार होतो आणि नंतर तो जाम होतो. ही समस्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे निर्माण होते आणि दुरुस्तीसाठी हजारोंचा खर्च ओढवतो. पण काही सोप्या देसी उपायांनी तुम्ही ही अडचण टाळू शकता.

सिंकमध्ये टाकू नयेत अशा गोष्टी

कॉफी ग्राउंड्स (कॉफीचे उरलेले कण): हे तेल किंवा साबणासोबत मिसळून चिकट थर तयार करतात आणि पाइपलाईन ब्लॉक करतात.

तेल किंवा तूप: गरम असताना द्रव असतं, पण थंड झाल्यावर चिकट होतं आणि पाइपमध्ये अडकतं.

अड्यांचे आवशेष हे लहान तुकडे होऊन पाइपमध्ये जाऊन अडकतात.

भात, पास्ता: हे पाण्यात फुगून पाइपला अडथळा निर्माण करतात.

भाजीपाल्याच्या साली: थेट पाइपमध्ये गेले तर ब्लॉकेज होतो.

कॉफी ग्राउंड्स का टाकू नयेत सिंकमध्ये?

प्रोफेशनल क्लीनर जॉय रामोस यांच्या मते, कॉफीचे उरलेले तुकडे म्हणजे ‘कॉफी ग्राउंड्स’ पाइपमध्ये गेल्यावर ते तेल, साबणाच्या फेसासोबत मिसळतात आणि एक चिकट थर तयार करतात. हाच थर हळूहळू पाइपच्या भिंतींवर साचत जातो आणि पाइप ब्लॉक होतो. ही समस्या घरापुरतीच मर्यादित राहत नाही. वेळेवर लक्ष दिलं नाही तर संपूर्ण ड्रेनेज सिस्टीमवर परिणाम होऊ शकतो.

पाईपलाइन ब्लॉक झाली असेल तर काय करावं?

जर तुम्ही आतापर्यंत कॉफी सिंकमध्ये टाकत असाल, तर लगेच चिंता न करता उपाय करा. सर्वप्रथम गरम पाणी आणि डिश वॉशिंग लिक्विडचा वापर करून पाइपमध्ये टाका. हे थोडीशी चिकटपणा साफ करेल. जर त्याने उपयोग झाला नाही, तर देसी उपाय म्हणजे बेकिंग सोडा आणि व्हिनेगर वापरा. अर्धा कप बेकिंग सोडा पाइपमध्ये टाका आणि नंतर त्यावर एक कप व्हिनेगर. 10 मिनिटांनी त्यावर उकळतं पाणी टाकून पाइप साफ करा.

डिस्पोज कसं करावं?

हे सर्व पदार्थ थेट कचराकुंडीत टाका. कॉफी ग्राउंड्स गार्डनच्या कुंड्यांमध्ये खत म्हणून वापरू शकता. तेल, तूप एखाद्या बाटलीत जमा करून फेकावं. भाजीपाल्याचे साले कम्पोस्टिंगसाठी वापरा.

दर आठवड्याचे सिंक क्लीनिंग उपाय:

1. दर आठवड्याला एकदा उकळतं पाणी सिंकमध्ये ओता.

2. दर महिन्याला बेकिंग सोडा आणि व्हिनेगर वापरा.

3. सिंकवर स्टील किंवा प्लास्टिकचं फिल्टर झाकण ठेवा.