कंबर आणि पाठ दुखतेय? भयंकर त्रास होतोय? मग या टिप्स फॉलो करा!
पाठ आणि कंबर दुखी हा बहुतेकांना होणारा त्रासदायक आजार आहे. या लेखात पाठदुखीची कारणे, जसे की चुकीची आसन, तणाव आणि कमी झोप, यांची चर्चा केली आहे.

बहुतेकांमध्ये एक आजार कॉमन आहे. तो म्हणजे पाठ किंवा मणक्याचं दुखणं. पाठ दुखण्यामुळे कंबरही दुखते. त्याची असंख्य कारणे असू शकतात. एकाच जागी बसूनही पाठदुखी होते. किंवा सतत उभं राहिल्यानेही पाठदुखीचा त्रास होतो. त्यामुळे कंबरही दुखते. याशिवाय अॅसिडिटीमुळेही पाठदुखीचा त्रास होत असतो. अनेक लोक कामाच्या ठिकाणी खुर्चावर व्यवस्थित बसत नाहीत. ऑफिसमध्ये सतत डेस्कवर बसून काम करत असताना अचानक पाठीला, कंबरेला दुखू लागते. काही लोक सुरुवातीला याकडे लक्ष देत नाहीत. तिथेच चूक होते. जर कंबर दुखणे दोन-तीन दिवसांमध्ये कमी झाले नाही, तर सावध राहणे आवश्यक आहे. डॉक्टर पाठीचे आणि कंबरेचे दुखणे कमी करण्यासाठी वेगवेगळ्या औषधांची शिफारस करतात. पण तुम्हाला औषधे घ्यायची नसेल, तर काही पद्धतीने या वेदनेपासून आराम मिळवता येऊ शकतो.
या गोष्टी करा
नियमित व्यायाम :
पाठीच्या आणि कंबरेच्या वेदनेचा अनेकांना खूप त्रास होतो. काही लोकांना हलणंही कठिण होतं. अशा वेदना जाणवल्यास काही योगासन केले आणि स्ट्रेचिंग केले, तर आराम मिळतो. नियमित व्यायाम केल्याने फायदा होईल.
थंड किंवा गरम शेक :
अपघात झाल्यानंतर कंबर दुखू लागल्यास बर्फाने शेकल्यास आराम मिळतो. रक्त गोठलेले असल्यास शेक दिल्याने त्याला आराम मिळतो. तर गरम पाण्याचा शेक दिल्यास रक्ताभिसरण व्यवस्थित होते.
शरीराची स्थिती बदलणे :
एकाच जागी बसून बराचवेळ पाठीला, कंबरेला वेदना होतात. अनेक लोक झोपताना योग्य स्थितीत झोपत नाहीत. काही वेळा झोपेची पद्धत चुकीची झाल्यास कंबरेवर ताण येतो. तज्ज्ञांच्या मते, योग्य प्रकारे झोपणे महत्त्वाचे आहे. टेबल आणि खुर्चीवर काम करत असताना, पाठीला सरळ ठेवणे आवश्यक आहे.
मानसिक आरोग्य :
शरीराच्या वेगवेगळ्या भागात होणाऱ्या वेदनांशी मानसिक तणाव किंवा नैराश्याचा संबंध असतो, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, पण हे सत्य आहे. संशोधनातून ही बाब समोर आली आहे. वेदनारहित जीवन जगण्यासाठी मानसिक तणाव नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे आहे.
पुरेशी झोप :
झोपेशी पाठ आणि कंबरेच्या वेदनांचा काय संबंध आहे, असं अनेकांना वाटू शकतं. परंतु याचा खूप महत्त्वपूर्ण संबंध आहे. तज्ज्ञांच्या मते, कमी झोप घेतल्यास कंबर दुखणे वाढू शकते. दिवसभरातील विविध कामे झाल्यानंतर शरीराचे स्नायू आणि मज्जासंस्था झोपेच्या वेळेस आराम करतात. त्यामुळे वेदनांपासून मुक्त राहण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी 7 ते 8 तासांची झोप घेणे महत्त्वाचे आहे.