AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मैदा, कोरफड आणि मुलतानी मातीचा ‘हा’ फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर करा!

तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी आपण काही घरगुती फेसपॅकचा वापर केला पाहिजे. ज्यामुळे आपली त्वची नैसर्गिक रित्या चांगली होण्यास मदत होते.

मैदा, कोरफड आणि मुलतानी मातीचा 'हा' फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर करा!
फेसपॅक
| Edited By: Anish Bendre | Updated on: Aug 02, 2021 | 8:22 AM
Share

मुंबई : तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी आपण काही घरगुती फेसपॅकचा वापर केला पाहिजे. ज्यामुळे आपली त्वची नैसर्गिकरित्या चांगली होण्यास मदत होते. त्वचा तजेलदार आणि मुलायम करण्यासाठी आपण मैदा, कोरफड आणि मुलतानी मातीचा फेसपॅक आपल्या चेहऱ्याला लावला पाहिजे. (Aloe vera gel and multani soil face pack are beneficial for the skin)

हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी तीन चमचे मैदा, दोन चमचे मुलतानी माती आणि चार चमचे कोरफडचा गर घ्या. हे व्यवस्थित मिक्स करून याची चांगली पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण गुलाब पाकळ्या आणि मधाचा फेसपॅक आपल्या चेहऱ्याला लावू शकता. यामुळे आपली त्वचा चमकदार होण्याबरोबरच मुलायम आणि गुलाबी देखील होते. हा फेसपॅक तयार करण्यासाठी दोन चमचे गुलाब पाकळ्यांची पेस्ट आणि चार चमचे मध आपल्याला लागणार आहे. हे दोन्ही एकत्र करून चांगले मिक्स करून घ्या आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा.

हा फेसपॅक आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. वीस मिनिटांनंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवा. हा फेसपॅक आपण आठ दिवसांमधून दोन वेळा लावला पाहिजे. चंदन आणि दुधाचा फेसपॅक घरच्या घरी तयार करण्यासाठी दोन चमचे चंदन पावडर आणि तीन चमचे दुध घ्या. त्यानंतर याची चांगली पेस्ट तयार करा आणि संपूर्ण चेहऱ्यासोबत मानेला लावा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि पिंपल्यची समस्या दूर होण्यास मदत होते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Aloe vera gel and multani soil face pack are beneficial for the skin)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली