सुंदर, चमकदार आणि मुलायम केस हवेत? मग दोन दिवसातून एकदा केसांना अंडे लावा

| Updated on: Jul 18, 2021 | 7:12 AM

केस कितीही मोठे आणि घनदाट असतील मात्र ते चमकदार नसल्यामुळे निस्तेज दिसत असतील तर तुमचे सौंदर्य फिके पडते. केस चमकदार असणे हे निरोगी केसांचे लक्षण आहे.

सुंदर, चमकदार आणि मुलायम केस हवेत? मग दोन दिवसातून एकदा केसांना अंडे लावा
हेअर मास्क
Follow us on

मुंबई :  आपले केस कितीही मोठे आणि घनदाट असतील. मात्र ते चमकदार नसल्यामुळे निस्तेज दिसत असतील तर तुमचे सौंदर्य फिके होते. केस चमकदार असणे हे निरोगी केसांचे लक्षण आहे. त्यामुळे जर तुमचे केस निस्तेज दिसू लागले असतील तर नियमित केसांना अंडे लावण्यास सुरूवात करा. अंड्यामधील प्रोटीन्समुळे तुमच्या केसांना नैसर्गिक तेज मिळते. ज्यामुळे तुमचे केस सुंदर आणि चमकदार दिसतील. (Apply egg hair mask to get beautiful hair)

जर आपल्याला खरोखरच सुंदर आणि चमकदार केस हवे असतील तर आपण दोन दिवसातून एकदा तरी आपल्या केसांना अंडे लावले पाहिजे. ज्यामुळे आपल्या केसांच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल. आपण अंड्यासोबत खोबरेल तेल देखील मिक्स करून केसांना लावू शकतो. केसांना अंडे लावल्यानंतर साधारण वीस मिनिटे केसांवर अंडे राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपले केस धुवा.

अनेकदा तुमचे केस मध्येच तुटू लागतात किंवा कोरडे झाल्यामुळे त्यांना फाटे फुटतात. केसांना फाटे फुटले की केसांची वाढ रोखली जाते. केसांना पुरेसे पोषण न मिळाल्यामुळे ते निस्तेज दिसू लागतात. मात्र अंड्यातील ल्यूटीनमुळे केस गळणे थांबते आणि केस घनदाट दिसू लागतात. दोन अंड्याचा पांढरा भाग आणि चार चमचे ऑलिव्ह ऑईल मिक्स करून एक चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांना लावून एक तासाने केसांना शॅंपू करा.

आठवड्यातून दोनदा हा प्रयोग केल्यामुळे तुमचे केस गळणे आपोआप थांबेल. 2 अंडी, 6 चमचे दही, 1 चमचा लिंबाचा रस सर्वप्रथम अंडी फेटून घ्या. यात दही मिसळा. दही आणि अंडी व्यवस्थित फेटून झाल्यावर त्यात लिंबू रस मिसळा. यामुळे स्काल्पची नीट स्वच्छता होते. या मिश्रणाला व्यवस्थित केसांमध्ये लावून घ्या आणि 30 मिनिटे थांबा. यानंतर केसांना व्यवस्थित शॅम्पू आणि कंडीशनर लावून स्वच्छ धुवून घ्या.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Apply egg hair mask to get beautiful hair)