Malaika Arora Fitness Tips :’फिट’ डाएटमुळे मलायकाचं वय दिसत नाही!, तुम्हीही या टिप्स फॉलो करा, तरूण दिसा…

| Updated on: May 07, 2022 | 12:33 PM

मलायका अरोरा स्वतःला स्लिम-ट्रिम ठेवण्यासाठी व्यायाम करण्यासोबतच डाएट प्लॅन देखील फॉलो करते.मलायका तिच्या दिवसाची सुरुवात मध आणि लिंबाचा रस मिसळून ते पाणी पिऊन करते.

Malaika Arora Fitness Tips :फिट डाएटमुळे मलायकाचं वय दिसत नाही!, तुम्हीही या टिप्स फॉलो करा, तरूण दिसा...
मलायका अरोरा
Follow us on

मुंबई : सेलब्रिटी मंडळींना अनेकजण फॉलो करतात. त्यांच्या सारखं राहण्याचा त्यांच्यासारखं वागण्याचा… पण ही सेलिब्रिटी मंडळीची आणखी एक गोष्ट तुम्ही फॉलो केली तर तुम्ही निरोगी आणि फिट राहू शकता. बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या फिटनेसमुळे नेहमी चर्चेत असते. तिचं वय 48 वर्षे इतकं आहे. पण तरिही तिचा फिटनेस चांगला आहे. तिच्या चेहऱ्यावरून तिच्या वयाचा अंदाज येत नाही. मलायका तिच्या फिटनेससाठी व्यायाम, योगा आणि डाएट फॉलो करते. त्यात ती कोणत्याही प्रकारची तडजोड करत नाही. त्याचमुळे तिचा फिटनेस चांगला (Malaika Arora Fitness Tips) आहे. ती फॉलो करत असलेल्या गोष्टी जर तुम्ही आमलात आणल्यात तर तुम्हीही चांगला फिटनेस मिळवू शकता शिवाय तुमचं आरोग्यही चांगलं राहील.

मलायकाचा ‘फिट’ डाएट

मलायका अरोरा स्वतःला स्लिम-ट्रिम ठेवण्यासाठी व्यायाम करण्यासोबतच डाएट प्लॅन देखील फॉलो करते.मलायका तिच्या दिवसाची सुरुवात मध आणि लिंबाचा रस मिसळून ते पाणी पिऊन करते. याशिवाय वर्कआउट केल्यानंतर मलायका प्रोटीन शेकसोबत केळी खाते. याशिवाय मलायका तिच्या शरीराला डिटॉक्स करण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी पिते.

मलायका सकाळच्या नाश्त्यामध्ये ताजी फळं, पोहे, इडली, उपमा किंवा मल्टीग्रेन टोस्टसोबत अंड्याचा पांढरा भाग घेते. संध्याकाळच्या वेळी मलायकाला ताज्या फळांचा रस, अंड्याचा पांढरा आणि ब्राऊन ब्रेड टोस्ट घेते. दुपारच्या जेवणात ती 2 रोट्या, भात, भाज्या, चिकन आणि स्प्राउट्स खाते. रात्रीचं जेवण हलके ठेवण्यासाठी मलायका रात्री वाफवलेल्या भाज्यांसोबत सॅलड आणि सूप घेते. ती सगळं काही खाते पण मर्यादित प्रमाणात…

त्यामुळे तिच्या या टिप्स फॉलो करा आणि फिट राहा!

मिलिंद सोमणच्या काही टिप्स्

फिटनेस फ्रिक म्हणून ओळखला जाणाऱ्या मिलिंद सोमणचा डाएट प्लॅन कसा असतो, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. मिलिंद त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे सतत विविध टिप्स देत असतो आणि त्याच्या हेल्थी लाईफस्टाईलविषयी सांगत असतो. आता एका पोस्टच्या माध्यमातून त्याने त्याच्या डाएटविषयी सांगितलं आहे.

“मी दररोज धावत नाही, परंतु मी दररोज 15-20 मिनिटे व्यायाम आवर्जून करतो, जेणेकरुन मला दुखापत न होता मला पाहिजे ते करता येईल. जसं वय वाढत जातं, तसे तुम्ही कमकुवत होत जाता आणि त्यापासून वाचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नियमित व्यायाम करणं. हा व्यायाम कोणताही जोर न लावता करत राहणं. आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी सर्वोत्कृष्ट व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार – हे तुम्ही कराल तितकं सोपं किंवा अवघड असू शकतं. शरीरात चांगलं रक्ताभिसरण होत राहणं आणि तुम्हाला हवं तसं तुमच्या शरीराची हालचाल कोणत्याही त्रासाशिवाय करता यावी.. ही दोन व्यायामाची मूलभूत उद्दिष्टे आहेत,” असं त्याने एका पोस्टमध्ये लिहिलं आहे.