AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्वचा तेजस्वी हवीय? मग रात्री ‘हे’ पाणी लावायलाच विसरू नका!

झोपण्यापूर्वी चेहरा बेसनाच्या पाण्याने धुतल्याने या समस्यांवर मात करता येते.हा एक पारंपरिक आणि नैसर्गिक उपाय असून त्वचेसाठी आधुनिक काळातही उपयुक्त ठरतो. त्यामुळे महागड्या प्रॉडक्ट्सपेक्षा घरगुती बेसनाचं पाणी एक उत्तम आणि परिणामकारक पर्याय ठरतो.

त्वचा तेजस्वी हवीय? मग रात्री 'हे' पाणी लावायलाच विसरू नका!
GLOWING SKIN
| Updated on: Jun 11, 2025 | 2:08 PM
Share

आजच्या युगात सुंदर, चमकदार आणि निरोगी त्वचा मिळवण्यासाठी अनेकजण महागड्या सौंदर्यप्रसाधनांवर भरवसा ठेवतात. मात्र केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सचा दीर्घकालीन वापर त्वचेला अपायकारक ठरू शकतो. त्यामुळे आता अनेकजण नैसर्गिक उपायांकडे वळत आहेत. त्यातलाच एक सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे “बेसनाचं पाणी”. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा बेसनाच्या पाण्याने धुतल्यास अनेक त्वचासमस्यांपासून मुक्ती मिळू शकते. चला पाहूया, हे बेसनाचं पाणी कोणत्या 6 प्रमुख स्किन समस्यांवर कसं काम करतं.

1. पिंपल्सपासून आराम : बेसनमध्ये असणारे नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल घटक त्वचेतील अतिरिक्त तेल दूर करून त्वचेचे पोअर्स (रोमछिद्रे) स्वच्छ करतात. यामुळे मुरूम व एक्नेच्या समस्येत लक्षणीय फरक दिसून येतो. रोज रात्री चेहरा बेसनाच्या पाण्याने धुतल्यास हळूहळू मुरूमांची तीव्रता कमी होते.

2. त्वचेतील डलनेस दूर होतो : बेसन त्वचेची खोलवर सफाई करतं आणि डेड स्किन हटवण्यास मदत करतं. त्यामुळे त्वचा ताजीतवानी आणि तेजस्वी दिसते. रात्री झोपण्यापूर्वी बेसनाचं पाणी चेहऱ्यावर लावल्याने सकाळी त्वचा फ्रेश आणि ग्लोइंग वाटते.

3. टॅनिंगपासून मुक्ती : बेसनामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असल्याने त्वचेची रंगत उजळवण्यासाठी ते उपयुक्त ठरतं. विशेषतः उन्हामुळे आलेली टॅनिंग यामुळे हळूहळू कमी होते. सततच्या वापराने त्वचेचा रंग एकसंध आणि नितळ दिसू लागतो.

4. ओपन पोअर्ससाठी फायदेशीर : अनेकांना चेहऱ्यावर ओपन पोअर्सची समस्या असते. बेसनाचं पाणी त्वचेला टाईट करतं, ज्यामुळे हे ओपन पोअर्स हळूहळू बंद होतात. यामुळे त्वचेचा टेक्सचर सुधारतो आणि चेहरा तरुण दिसतो.

5. तेलकट त्वचेसाठी उपाय : ज्यांची त्वचा सतत तेलकट राहते, त्यांच्यासाठी बेसन पाणी वरदान ठरू शकतं. हे त्वचेतील तेल साठा नियंत्रित करतं आणि त्वचा मॅट फिनिशमध्ये दिसू लागते. यामुळे ब्रेकआउट्सही कमी होतात.

6. पिग्मेंटेशनवर उपचार : बेसनाचं पाणी त्वचेची रंगत हळूहळू हलकी करतं. यामुळे डाग, काळे ठिपके आणि पिग्मेंटेशन कमी होण्यास मदत होते. काही आठवड्यांतच डाग फिकट होऊ लागतात आणि त्वचा स्वच्छ आणि उजळ दिसते.

हे बेसन पाणी कसं तयार कराल?

1. एका स्वच्छ वाटीत १ टेबलस्पून बेसन घ्या.

2. त्यात हळूहळू १ कप कोमट पाणी घाला.

3. बेसन चांगलं विरघळून एकसंध द्रव तयार होईपर्यंत पाणी ढवळत राहा.

4. त्वचेच्या प्रकारानुसार लिंबाचा रस (ऑयली स्किनसाठी) किंवा मध/गुलाबपाणी (ड्राय स्किनसाठी) घालू शकता.

5. हे मिश्रण तयार झाल्यावर ते पातळ बेसन पाण्यासारखं दिसेल.

6. आता हे बेसन पाणी कॉटनच्या मदतीने किंवा हाताने चेहऱ्यावर लावा.

7. नंतर 10 मिनिटात चेहरा धुवा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.