चूल की गीझर, कशात तापवलेले गरम पाणी शरीरासाठी फायदेशीर? जाणून घ्या फायदे-तोटे

हिवाळा सुरु झाल्यानंतर कडक पाणी असले की शरीराला उबदार वाटते. पण, तुम्ही मातीच्या चुलीवर पाणी गरम करता की गॅस गिझरवर? यावर सर्व काही अवलंबून आहे. याविषयी सविस्तर जाणून घ्या.

चूल की गीझर, कशात तापवलेले गरम पाणी शरीरासाठी फायदेशीर? जाणून घ्या फायदे-तोटे
Follow us
| Updated on: Nov 10, 2024 | 10:36 PM

हिवाळा सुरु झाल्यानंतर गरम पाण्याचा वापर देखील वाढला आहे. आजही बऱ्याच ठिकाणी चुलीवर तापवलेले पाणी वापरले जाते. पण हल्ली गॅस आणि गिझर आल्यामुळे त्याचाही सर्रास वापर केला जातो. पण चुलीवर तापवलेले पाणी शरीरासाठी चांगले की गॅसवरचे पाणी चांगले असा प्रश्न कायम विचारला जातो. आता आपण चुलीवर गरम केलेले पाणी आणि गॅस गिझरमध्ये तापवलेल्या गरम पाण्यातला फरक जाणून घेणार आहोत. ज्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर, त्वचेवर होऊ शकतो. या दोघांमध्ये काय फरक आहे, ते जाणून घ्या.

पाण्याचे तापमान आणि स्थिरता

मातीची चूल: यामध्ये पाणी हळूहळू गरम होऊन एकसमान तापमानावर राहते. या प्रक्रियेत पाण्याचे तापमान फारसे वाढत नाही. ज्यामुळे ते त्वचा आणि आरोग्यासाठी चांगले मानले जाते.

गॅस किंवा गिझर: गिझरमधील पाणी वेगाने गरम होते. त्याचे तापमान जास्त असते. हे नियंत्रित करणे कठीण असते. यामुळे त्वचेला अचानक गरम पाण्याचा स्पर्श होतो.

मातीच्या चुलीचा नैसर्गिक परिणाम

मातीच्या चुलीत पाणी गरम केल्याने मातीच्या खनिजांसारखे नैसर्गिक घटक पाण्यात सापडतात. या मिनरल्समुळे पाण्याला खास गुणधर्म मिळतात. जे त्वचेसाठी फायदेशीर मानले जातात. पण गॅस गिझरमध्ये तापवलेल्या पाण्यात कोणतेही नैसर्गिक घटक आढळत नाहीत. त्यामुळे त्यावर तापलेल्या गरम पाण्याचे काहीही फायदे होत नाहीत.

ऊर्जेचे स्त्रोत आणि वातावरणावर होणारा परिणाम

मातीची चूल : पारंपरिक पद्धतीने लाकूड किंवा शेण जाळून पाणी तापवले जाते. त्यामुळे वातावरणात धूर निर्माण होतो. ही पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर यात होतो.

गॅस गिझर: गॅस गिझर ऊर्जेसाठी वायूचा वापर करतो, जो कमी वेळात पाणी गरम करू शकतो. परंतु ऊर्जा स्त्रोत देखील वापरतो आणि पर्यावरणावर त्याचा परिणाम होतो.

पाण्याची गुणवत्ता

मातीची चूल: मंद आचेवर पाणी गरम केल्याने पाण्याची पीएच पातळी स्थिर राहते, जी त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते.

गॅस गिझर: गिझरमधील पाणी वेगाने गरम होते, ज्यामुळे पाण्यातील ऑक्सिजन कमी होतो. विशेषत: हिवाळ्यात या पाण्यामुळे त्वचा थोडी कोरडी पडू शकते.

आरोग्यासाठी फायदे

मातीच्या चुलीत गरम केलेल्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीराचा थकवा कमी होतो. तसेच त्वचेत ओलावा राहतो, असे मानले जाते. पण गॅस किंवा गिझरवर तापवलेले पाणी वापरले तर पाणी जास्त गरम होते. यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते.

पारंपारिक आणि आधुनिक उपयुक्तता

मातीची चूल ही पारंपरिकपणे वापरली जाते. यात हळूहळू पाणी गरम केले जाते. आजही अनेक ग्रामीण भागात याचा वापर केला जातो.

गॅस गिझर: आधुनिक जीवनशैलीनुसार गीझर वेगवान, सोयीस्कर आणि वेळेची बचत करणारे आहेत. शहरी भागात याचा वापर अधिक केला जातो.

त्वचा आणि आरोग्यविषयक फायदे पाहिले तर मातीच्या चुलीत गरम केलेले पाणी अधिक फायदेशीर मानले जाते. मात्र सोयीसुविधा आणि वेळेच्या बचतीच्या दृष्टीने गॅस गीझर हा एक चांगला पर्याय आहे.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.