Skin Care : सुरकुत्या आणि त्वचा सैल पडण्याची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा!

चेहरा सुंदर आणि तजेलदार असावा असे प्रत्येकालाच वाटते. मात्र, बदलेल्या जीवनशैलीमध्ये आपण म्हणावे तसे त्वचेकडे लक्ष देऊ शकत नाहीत.

Skin Care : सुरकुत्या आणि त्वचा सैल पडण्याची समस्या दूर करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय नक्की करा!
फेसपॅक
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 9:48 AM

मुंबई : चेहरा सुंदर आणि तजेलदार असावा असे प्रत्येकालाच वाटते. मात्र, बदलेल्या जीवनशैलीमध्ये आपण म्हणावे तसे त्वचेकडे लक्ष देऊ शकत नाहीत. ज्यामुळे आपल्या त्वचेवर अत्यंत कमी वयातच सुरकुत्या आणि आपली त्वचा सैल पडण्यास सुरूवात होते. यामुळे कमी वयातच आपले वय जास्त दिसते. चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि सैल त्वचा दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. (Do this home remedy to get rid of wrinkles and loose skin)

आपण दिवसातून दोन वेळा फेस स्टीम घेतली पाहिजे. ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि त्वचा सैल पडण्याची समस्या दूर होण्यास मदत होते. मात्र, फेस स्टीमसाठी आपण जास्त पाणी गरम करू नये. यामुळे आपला चेहरा लालसर होण्याची अधिक शक्यता असते. केळी आणि खोबरेल तेलाचा फेस पॅक तयार करण्यासाठी आपल्याला एका वाडग्यात केळी मॅश करावी लागतील. या केल्याच्या मिश्रणात एक चमचा खोबरेल तेल मिसळून चेहऱ्यावर लावा.

कोरडा झाल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यास मदत होते. सैल त्वचेची समस्या दूर करण्यासाठी आपण हरभरा डाळ भाजून घ्या. यानंतर, डाळ दुधात भिजवून घ्या आणि ही डाळ चांगली भिजल्यानंतर त्याची बारीक पेस्ट करून घ्या. ही पेस्ट किमान एक ते दीड तास चेहर्‍यावर लावा. चेहऱ्यावर फेस पॅक लावलेला असताना, कुणाशीही बोलू नका किंवा हावभाव करू नका. अन्यथा, त्वचा सैल होईल. सुकल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा.

दूध लावून चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर त्वचेवर अन्य कोणतेही प्रोडक्ट लावण्याची आवश्यकता नाही. मग तुमची त्वचा तेलकट असो किंवा कोरडी असो पण आपण जर हा उपाय रात्रीच्या वेळेस करणार असाल तर तेलकट त्वचा असणाऱ्यांनी त्वचेवर गुलाब पाणी आणि त्वचा कोरडी असल्यास आपण नाइट क्रीमचा उपयोग करावा. यामुळे त्वचेला अतिरिक्त पोषण तत्त्वांचा पुरवठा होईल आणि त्वचेतील पेशीही जलदगतीने दुरुस्त होतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Do this home remedy to get rid of wrinkles and loose skin)

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.