AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंडी आणि मधाचा फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !

या हंगामात त्वचा कोरडी, लालसर आणि निर्जीव होते. ज्यामुळे आपला चेहरा निस्तेज दिसतो. कोरोनामुळे आपण पार्लरमध्ये जाऊ शकत नाही आणि फेस पॅक, आणि स्क्रब देखील मिळवू शकत नाही.

अंडी आणि मधाचा फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !
हेल्दी आणि सुंदर त्वचा
| Edited By: | Updated on: Jun 28, 2021 | 6:20 PM
Share

मुंबई : या हंगामात त्वचा कोरडी, लालसर आणि निर्जीव होते. ज्यामुळे आपला चेहरा निस्तेज दिसतो. कोरोनामुळे आपण पार्लरमध्ये जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत आपण आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी घरी असलेल्या वस्तूंच्या सहायाने फेसपॅक तयार करू शकतो. फेसपॅकमुळे तुमची निर्जीव त्वचा हायड्रेट करण्यात होते. सुंदर आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी अंडी आणि मधाचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. (Egg and honey face pack is beneficial for the skin)

यासाठी आपल्या एक अंडी आणि चार चमचे मध लागणार आहे. सर्वात अगोदर एक अंड घ्या आणि ते चांगले फेडून घ्या आणि त्यामध्ये मध मिक्स करा. ही पेस्ट चांगली मिक्स झाल्यानंतर संपूर्ण चेहऱ्याला लावा. साधारण एक तास ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर तशीच ठेवा आणि त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. हा फेसपॅक आपण आठवड्यातून तीन ते चार वेळा लावला पाहिजे. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील, पिंपल्स, मुरूमाचे डाग, सुरकुत्या जाण्यास नक्की मदत होते.

अंड्यामध्ये मध मिसळा आणि दररोज चेहऱ्यावर लावा. हे आपल्या त्वचेला पोषण देईल तसेच एका आठवड्यात आपल्या चेहऱ्यावरही फरक दिसून येईल. सलग 15 दिवस हे केल्यानंतर, आपण दर दोन ते तीन दिवसांनी हे लागू शकतो. हे केल्याने आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यास मदत होते. एक चमचा संत्राच्या रसात अंडे घाला आणि चांगले मिसळा. जेंव्हा या मिश्रणाला फेस येतो तेव्हा त्यात अर्धा चमचा हळद घाला आणि चेहऱ्यावर लावा. काही वेळाने हलक्या हाताने चेहऱ्यावर मालिश करा.

कोरडे झाल्यानंतर ते स्क्रब करून काढा. असे काही दिवस केल्याने मुरुमांच्या समस्या दूर होण्यास मदत मिळेल. अंडी फेसपॅक वृद्धत्वाचा प्रभाव लपविण्यासाठी देखील कार्य करते. कारण त्यामध्ये वृद्धत्व विरोधी गुणधर्म असतात. हा पॅक तयार करण्यासाठी 1 अंडे घ्या आणि त्यामध्ये 4 ते 5 थेंब तेल मिक्स करा. हे चांगले मिसळा आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यावर चेहरा धुवा. अंड्यातील फक्त पिवळा बलकमध्ये एक चमचा मध मिसळा. हे मिश्रण चेहर्‍यावर लावा आणि नंतर ते पाण्याने धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Egg and honey face pack is beneficial for the skin)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली